Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसतात, तर काही व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक होतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
काही माणसांची स्वप्न मोठी असतात मोठ्या गोष्टी घडल्यानंतरच या लोकांना आनंद होतो. तर काहींना छोट्या गोष्टींचा देखील खूप आनंद होतो. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक चिमुकला त्याच्या वडिलांनी आणलेली सेकंड हँड सायकल पाहून खूप खुश झालेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये त्या मुलाचे वडील हे सायकलची पूजा करताना दिसत आहेत, तर तो मुलगा आनंदाने टाळ्या वाजवताना दिसत आहे.
आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन अवनीश यांनी त्याला कॅप्शन दिलं, 'ही केवळ एक सेकंड हँड सायकल आहे. पण त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहा. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा मर्सिडीज कार खरेदी केल्यासारखा आहे. '
व्हिडीओला नेटकऱ्यांनी केल्या कमेंट
व्हायरल झालेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. अनेकांनी व्हिडीओला कमेंट करुन त्या मुलाचे आणि त्याच्या वडिलांचे कौतुक केले आहे. व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कॅप्शन दिलं, "सुंदर" तर दुसरा म्हणाला, 'मला देखील माझी सायकल आवडते. तिच्यासोबत माझ्या बऱ्याच आठवणी आहेत.' तर एक युझर म्हणाला, 'आनंदाची किंमत नसते.' 80 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे.
अवनीश हे सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
हेही वाचा :
- Viral Video : वाघिणीच्या बछड्यांचं पालन करतोय कुत्रा, थक्क करणारा व्हिडीओ मन जिंकेल
- Viral Video : गादीवर झोपण्यासाठी हत्तीच्या पिल्लाचे नखरे एकदा पाहाच, तुम्हीही प्रेमात पडाल
- Trending Video : तलावावर एकत्र पाणी पिण्यासाठी पोहोचले बिबट्या आणि हरिण, पुढे काय झालं तुम्हीच पाहा