Viral Video : चक्क मानवाच्या अंत्यदर्शनाला पोहोचले माकड, मृतदेहाच्या शेजारी बसून 'हे' केले, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक
Viral Video : काही प्राणी त्यांची काळजी घेणार्या व्यक्तीला कधीच विसरत नाही. सोशल मीडीयावर एक भावूक व्हिडीओ समोर आला आहे.
Viral Video : मानव आणि प्राणी यांचे नाते अतिशय अनोखे आहे. माणसं त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीला विसरतात, पण काही प्राणी त्यांची काळजी घेणार्या व्यक्तीला कधीच विसरत नाही. सोशल मीडीयावर (Social Media) एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक माकड एका माणसाच्या अंत्यदर्शनाच्या कार्यक्रमात सहभागी होतच नाही, तर त्याला उठवण्याचाही प्रयत्न करत आहे. एक भावूक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये एक माकड तरुणाच्या मृतदेहाजवळ बसलेला असून मृतदेहाला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
View this post on Instagram
मृतदेहाच्या डोक्याजवळ बसून 'हे' केले
असे म्हणतात की, माणसाने माकडाची खूप काळजी घेतली आणि त्याला खायलाही दिले. अशा परिस्थितीत दोघांमध्ये घट्ट मैत्रीही निर्माण झाली होती. आता माकडाच्या मित्राचा मृत्यू झाला आहे आणि त्याचा मृतदेह त्याच्यासमोर पडून असल्याने तो उचलण्याचा प्रयत्न करत आहे.
उठ माझ्या मित्रा, खूप उशीर झाला
या दु:खाच्या काळात अनेक कुटुंबीय आणि नातेवाईक व्हिडीओमध्ये आजूबाजूला उभे असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी माकड माणसाच्या मृतदेहाजवळ बसलेला दिसतो. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिले की, हा माकड त्या माणसाचा मृतदेह हलवण्याचा प्रयत्न करत आहे, पण काही उपयोग झाला नाही. कदाचित हा माकड त्याच्या मानवी मित्राला असे म्हणत असेल, उठ माझ्या मित्रा, खूप उशीर झाला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भावनिक व्हिडीओ व्हायरल
प्राणी आणि त्याची काळजी घेणारा मानव मित्र यांच्यातील नाते दाखवणारी ही हृदयद्रावक घटना लोकांना भावूक करून गेली. यामुळेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही हा भावनिक व्हिडिओ शेअर करत आहेत. ज्यामध्ये एक माकड तरुणाच्या मृतदेहाजवळ बसलेला असून मृतदेहाला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
इतर बातम्या
Mohali : जत्रेत 50 फूट उंचीवरून खाली कोसळला आकाश पाळणा, अनेक जण जखमी, थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल