Viral Video : लग्नसोहळ्यादरम्यान नववधूने स्टेजवरच केलं फायरिंग; व्हायरल व्हिडओवर पोलिसांची कारवाई
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये वरमाला घातल्यानंतर नववधू हवेत गोळीबार करताना दिसत आहे.
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हाथरस (Hathras) या भागातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नववधू (Bride) स्टेजवर फायरिंग करताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
लग्नमंडपात एक नववधू आणि वर एका सोफ्यावर बसले आहेत. दरम्यान एक व्यक्ती नववधूच्या हातात पिस्तूल देतो. त्यानंतर नववधू फायरिंग करते. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील हाथरस या भागातील आहे. आता गोळीबाराशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नववधू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश: हाथरस के नगला शेखा इलाके में एक दुल्हन द्वारा जश्न मनाने के दौरान फायरिंग की गई।
— ANI_HindiNews (@AHindinews) April 9, 2023
अतिरिक्त एसपी अशोक कुमार सिंह ने बताया, "पुलिस द्वारा सुसंगत धाराओं में अभियोग पंजीकृत कर आगे की कार्रवाई की जा रही है।"
(नोट: पुलिस ने वीडियो की पुष्टि की है।) pic.twitter.com/X9GOFVLSuk
हाथरस जंक्शनचे गिरीश चंद गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार,"हाथरसमध्ये राहणाऱ्या रागिणी या नववधूविरोधात आयपीसी कलम 25(9) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आता अटकेच्या भीतीने नववधू फरार झाली आहे. सध्या पोलीस तिचा तपास घेत आहेत. तसेच वधूला पिस्तूल देणाऱ्या व्यक्तीचादेखील आम्ही तपास घेत आहोत".
23 वर्षीय रागिणीविरोधात गुन्हा दाखल
लग्नमंडपात गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी 23 वर्षीय रागिणी या नववधूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रागिणीच्या एका नातेवाईकाने शुक्रवारी रात्री हातरस जिल्ह्यातील एका गेस्ट हाऊसमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वरमाला घातल्यानंतर नववधू हवेत गोळीबार करताना दिसत आहे.
हाथरस के नगला शेखा की दुल्हन का हर्ष फायरिंग करते हुए वीडियो हुआ वायरल। यहाँ के हसायन थाना क्षेत्र के एक गेस्ट हाउस में स्टेज पर बैठी दुल्हन पिस्टल से एक हाथ से लगातार चार फायर करती नज़र आ रही है @Uppolice pic.twitter.com/OeCo7g1uuP
— @ पं.सुशील दूबे (@ptsushildubey) April 9, 2023
अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या प्रकरणी चौकशी सुरू आहे. लग्नसमारंभात गोळ्या झाडल्यानंतर गोळीबाराशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नववधू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ज्या व्यक्तीने नववधूला पिस्तूल दिली त्या व्यक्ती विरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या