Viral Video : पावसात भिजायचे नसेल तर करा हा जुगाड, ना कपडे ओले होणार, ना पायाला चिखल लागणार
Viral Video : पाऊस झाल्यानंतर रस्त्यावरील चिखळामुळे आपले पाय आणि कपडे खराब होतात. मात्र, याच चिखलापासून स्वतःला वाचवण्यासाठी एका व्यक्तीने जुगाड शोधून काढला आहे.
![Viral Video : पावसात भिजायचे नसेल तर करा हा जुगाड, ना कपडे ओले होणार, ना पायाला चिखल लागणार unique desi jugaad for safe walk in rain video viral Viral Video : पावसात भिजायचे नसेल तर करा हा जुगाड, ना कपडे ओले होणार, ना पायाला चिखल लागणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/1f4d0825c17921a5312c3077a99eb88d1657045306_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Viral Video : महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन-चार दिवसांपासून चांगलीच हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे कामावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अनेक अडचणींनाचा सामना करावा लागत आहे. परंतु, या पावसात भिजू नये म्हणून काही जण वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. जुगाड करणाऱ्या लोकांची कमतरता नाही. कुठेही, कधीही, कोणतीही व्यक्ती जुगाड करत असते. परिस्थिती पाहून लोक नवनवीन जुगाड करत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या पाऊस सुरू झाला असून या पावसामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. ज्यांना घराबाहेर जावे लागते ते एकतर रेनकोट घालून किंवा छत्री घेऊन घराबाहेर पडतात. परंतु, छत्री घेतली तरी, रस्त्यावरील चिखळामुळे आपले पाय आणि कपडे खराब होतात. मात्र, याच चिखलापासून स्वतःला वाचवण्यासाठी एका व्यक्तीने जुगाड शोधून काढला आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती देसी जुगाड करत पावसापासून स्वतःला वाचवत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील व्यक्तीने दोन स्टूल घेतले आहेत आणि या स्टूलला दोन दोरी लावल्या आहेत. त्याला धरून तो पुढे सरकत आहे आणि आपल्या दुकानात जात आहे. पावसात पायांना चिखल आणि पाण्यापासून वाचवण्याचा हा उत्तम जुगाड आहे.
एका नेटकऱ्याने आपल्या ट्विटर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ CSC VLE RAJENDRA SAMEDIYA नावाच्या युजर्सने अपलोड केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'पाण्यात पडण्याची शक्यता फारच कमी आहे.' यासोबतच चार हसणारे इमोजीही शेअर केले आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून अनेक जण तो शेअर देखील करत आहेत.
इसमें गिरने की संभावनाएं काफी कम होती है 🤣🤣🤣🤣 https://t.co/WWOfnzxqkq pic.twitter.com/45qzxMHxTL
— CSC VLE RAJENDRA SAMEDIYA (@cScvleRajendra) July 2, 2022
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)