Trending Story : जगातील सर्वात जुना कुत्रा, ज्याचं वय 22 वर्षे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा ठरला मानकरी!
Trending Story : इंस्टाग्रामवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पेबल्स नावाच्या सर्वात जुन्या कुत्र्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे, हा कुत्रा आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा मानकरी ठरला आहे.
Trending Story : 28 मार्च 2000 रोजी जन्मलेल्या पेबल्स नावाच्या कुत्र्याचे वय 22 वर्षे 59 दिवस आहे. ही मादी आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने (Guiness World Record) नुकतेच निकाल जाहीर केले आहेत. ज्यामध्ये पेबल्स हा सर्वात जुना कुत्रा असल्याने त्याचे नाव नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा मानकरी बनला आहे. पेबल्स हा दक्षिण कॅरोलिनाचा आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा ठरला मानकरी!
पेबल्स कुत्रा 22 वर्षांचा आहे. याआधी सर्वात वयस्कर आणि जिवंत कुत्र्याचा गिनीज रेकॉर्ड टोबीकीथ नावाच्या 21 वर्षांच्या कुत्र्याच्या नावावर नोंदवला गेला होता. ज्याला पेबल्सच्या आधी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सर्वात वयस्कर कुत्र्याचा मान मिळाला होता. पण आता हे विजेतेपद अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील 22 वर्षीय टॉय फॉक्स टेरियर या पेबल्सने हिसकावले आहे. त्याच्या मालकाने या रेकॉर्डसाठी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डकडे अर्ज पाठवला होता. ज्यानंतर पेबल्सला या शीर्षकाचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.
सध्या कुत्र्याचे वय 22 वर्षे 59 दिवस
पेबल्सचा जन्म 28 मार्च 2000 रोजी झाला आणि सध्या त्याचे वय 22 वर्षे 59 दिवस आहे. पेबल्सची मालक ज्युली ग्रेगरी यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला सांगितले की, "पेबल्स हे एका जंगली जनावराप्रमाणे आहे, ज्याला दिवसा झोपायला आणि रात्रभर जागे राहणे आवडते."
View this post on Instagram
प्रत्येक चढ-उतारात, चांगल्या-वाईट काळात सोबत
पेबल्सबद्दल त्याचे मालक पुढे म्हणतात, "आम्ही खरोखरच देवाचे आभारी आहोत. कारण पेबल्स हा प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक चढ-उतारात, चांगल्या आणि वाईट काळात आमच्या सोबत असतो. आणि तो नेहमीच आमच्या आयुष्याचा आधार राहिला आहे. या कुटुंबाकडे ग्रेगरी नावाचा लहान कुत्रा देखील आहे. या कुत्र्याचे कमाल वय केवळ 15 वर्षे आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या