Trending news: 98 डायलिसिस झालेल्या पतीला पत्नीने दिली आपली किडनी, आधुनिक सावित्रीचे प्रेम पाहून नेटकरी भारावले!
Trending Husband Wife Story : जीवनाशी संबंधित अनेक फोटो, व्हिडिओ आणि बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही कथा थेट हृदयाला भिडतात.
Trending Husband Wife Story : आपल्या वास्तविक जीवनाशी संबंधित अनेक फोटो, व्हिडीओ आणि बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही कथा थेट हृदयाला भिडतात. अशीच एक वास्तविक जीवनाची कहाणी शेअर करताना, एका ट्वीटर यूजरने सांगितले आहे की, 98 डायलिसिसनंतर, पत्नीने पतीचा जीव वाचवण्यासाठी तिची किडनी दान केली.
आधुनिक सावित्रीचे प्रेम पाहून नेटकरी भारावले!
एका ट्विटर युजरने सांगितले की, त्याचे वडील आठवड्यातून तीन वेळा डायलिसिसचे सेशन घेत होते आणि त्यासाठी त्याची आई सेशन संपण्याची पाच ते सहा तासांपेक्षा जास्त वेळ वाट पाहत असे. लिओने ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, "आईने वडिलांचा जीव वाचवण्यासाठी तिची किडनी दान केली आणि आता ते दोघेही या दुःखातून बाहेर आले आहेत. यापेक्षा चांगली प्रेमकथा कोणतीच नाही."
Dad had to undergo 98 dialysis sessions and mom waited for 5-6 hours with him 3 days a week in here. Then she donated her kidney to save him and now they are both out of this misery. I dont know of a better love story. pic.twitter.com/LyIEEqVQxC
— Leo (@4eo) October 19, 2022
अनोखी प्रेमकहाणी
पती-पत्नी दोघांचेही वय 70 वर्षांपेक्षा जास्त आहे. किडनी निकामी झाल्याने त्यांना वारंवार डायलिसिस करावे लागत होते. डायलिसिस हा एक उपचार आहे, ज्यामध्ये मशीन वापरून रक्त फिल्टर केले जाते. जेव्हा तुमचे मूत्रपिंड त्यांचे काम करू शकत नाहीत, तेव्हा ते तुमचे रक्त स्वच्छ करतात. अनेकांना दर आठवड्याला डायलिसिस करावे लागते. अशा स्थितीत वृद्ध पत्नीने अखेर स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
आठवड्यातून 3 दिवस डायलिसिस
वडिलांची किडनी निकामी झाल्यानंतर एका व्यक्तीने ट्विटरवर संपूर्ण कहाणी शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की त्यांचे वडील आठवड्यातून तीन दिवस डायलिसिस सत्र घेत होते. या प्रक्रियेसाठी त्याची आई पाच ते सहा तास थांबायची. नंतर जीव वाचवण्यासाठी त्याने किडनी दान केली.
डॉक्टरांचे आभार
लिओ नावाच्या या व्यक्तीने सांगितले की, त्याचे आई-वडील दोघेही जवळपास 70 वर्षांचे आहेत.त्याने लिहिले की, 'वृद्धपणामुळे डॉक्टरांना 2 महिन्यांनी पुढे जाण्यासाठी सर्व विभागांकडून मंजुरी मिळाली. केरळमधील कोची येथील डॉक्टरांच्या कार्यक्षमतेबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. अवयवदानाबाबत जनजागृतीची गरजही त्यांनी अधोरेखित केली.