Trending News : आजपर्यंत आपण सर्वांनी अनेक प्रकारचे पक्षी पंख पसरून आकाशात उडताना पाहिले आहेत. पण तुम्ही कधी निर्जीव पक्षी हवेत उडताना पाहिले आहे का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महाकाय पक्षी हवेत उडताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. Amazing Innovations या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एका माणसाने हातात केशरी रंगाचा पक्षी धरलेला दिसत आहे,
व्हायरल व्हिडिओ मध्ये हा माणूस चहाच्या बागेत उभा राहून एका महाकाय पक्ष्याला डोंगरावरून आकाशात उडवित असल्याचे व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते. डोंगरावर वाहणारा सोसाट्याचा वारा त्या पतंगासारख्या पक्ष्याला वेगाने हवेत घेऊन वरच्या दिशेने घेऊन जातो. व्हायरल व्हिडिओमध्ये केशरी रंगाच्या पक्ष्याचे मोठे पंख दिसतात, ज्यामुळे तो हवेत खूप उंच उडू शकतो.
आतापर्यंत 19 हजारांहून अधिक व्ह्यूज
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का देताना दिसत आहे, या व्हिडिओला आतापर्यंत 19 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काही नेटकऱ्यांचा असा विश्वास आहे की पक्ष्याची रचना हलकी होती आणि रंगीबेरंगी कागदापासून बनवलेल्या शरीराला हवेत उडण्यास कोणतीही अडचण आली नाही, त्यानंतर हा निर्जीव पक्षी जोरदार वाऱ्यामुळे टेकडीवर उडताना दिसला.
महत्वाच्या बातम्या :