Viral Video : आजकाल बहुतेक जण त्यांचा अधिकाधिक वेळ सोशल मीडियावर घालवतात. सोशल मीडियावर प्राण्याचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. अनेक वेळा प्राण्यांचे शिकार करतानाचे व्हिडीओ व्हायरल होतात. असे व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधतात आणि त्यांच्या पसंतीस उतरतात. सध्या सोशल मीडियावर एक साप आणि पालीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये शिकारी सापाशी दोन पाली दोन हात करताना दिसत आहेत.


विषारी साप जेव्हा शिकार करतात तेव्हा तिथे थांबण्याऐवजी कोणीही जीव वाचवून पळून जाताना दिसतात. अलीकडेच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक विषारी साप आपल्या शिकारी पालीला पकडताना दिसत आहे, त्यादरम्यान पालीचा दुसरा साथीदार तिचा जीव वाचवण्याऐवजी आपल्या साथीदाराला वाचवताना दिसत आहे.






 


व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, छताला लटकलेला एक साप भिंतीवरील पालीला त्याच्या कुंडलीत पकडतो. यादरम्यान दुसरी पाल आपल्या साथीदाराचा जीव वाचवण्यासाठी सापावर हल्ला करते. यावेळी पाल सापाच्या तोंडाचा चाव घेताना दिसत आहे, त्यामुळे सापाची पकडही सैल होते.


सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला हजारांहून अधिक व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओ पाहताना नेटकरी चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha