Haldiram : हल्दीरामशी (Haldiram) संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवा वाद सुरू केला आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक रिपोर्टर हल्दीरामच्या दुकानातील स्नॅक्सच्या पॅकेटवर अरबी भाषेत लिहिलेल्या गोष्टीवर आक्षेप घेताना दिसत आहे. त्याच वेळी, स्टोअर मॅलेजर त्या पत्रकाराच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास स्पष्टपणे नकार देताना दिसतोय. या व्हिडिओनंतर अनेक लोक अरेबिकच्या समर्थनात येत आहेत, तर काही जण त्याचा विरोधही करत आहेत.




पाहा हा व्हिडीओ :


या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, हल्दीरामच्या स्टोअरमधील एक रिपोर्टर हातात फराळाचे पॅकेट घेऊन स्टोअर मॅनेजरला विचारतो की, तुम्ही त्यावर अरबी भाषेत काय आणि का लिहिले आहे. नवरात्रीत उपवास करणार्‍या हिंदूंना तुम्ही फसवत आहात, असे पत्रकाराचे म्हणणे आहे.


 






दुकान मॅनेजर काय म्हणतात ?


रिपोर्टरने प्रश्नांची मालिका सुरु ठेवल्यानंतर, स्टोअर मॅनेजरने उत्तर देण्यास नकार दिला. स्टोअर मॅनेजर म्हणाल्या, तुम्हाला जे करायचं ते करा, पण हल्दीराम हा आरोप सहन करून घेणार नाही. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक मानत नाही."  


 






 


 






लोकांच्या प्रतिक्रिया :


त्याचवेळी हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. काहींनी रिपोर्टरवर टीका केली, तर काहींनी हल्दीरामवर टीका केली आहे. काही लोकांनी त्याला अरबी म्हटले आहे. तर काही लोक ते अरबी भाषेत लिहिलेले आहे कारण हल्दीरामचे  प्रोडक्ट्स मध्य पूर्वेलाही निर्यात केले जातात. काही लोकांनी भारतीय रेल्वेचा साईन बोर्ड दाखवला ज्यात अरबी भाषेत लिहिले आहे. तर काहींनी भारतीय चलनाचा उल्लेख केला, जो अरबी भाषेतही लिहिलेला आहे.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha