Sara Ali Khan : सारा अली खानच्या (Sara Ali Khan) 'चका चक' (Chaka Chak) गाण्यावर चिमुकलीचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सारा अली खान आणि धनुषच्या 'अतरंगी रे' सिनेमातील 'चका चक' हे गाणं प्रचंड गाजलं होतं. सध्या या गाण्यावर एक चिमुकली थिरकताना दिसत आहे.

  


सध्या 'चका चक' गाण्यावर डान्स करतानाचा एका लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. व्हिडीओतील चिमुकली सारासारखीच डान्स करताना दिसत आहे.





व्हायरल होत असलेला व्हिडीओ अवयाना केनिशा नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक गोंडस मुलगी 'चका चक' गाण्यावर सारा अली खानप्रमाणे डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


संबंधित बातम्या


Viral Video : शिकारीच झाला शिकार; सापाचा पालीवर जोरदार हल्ला, नंतर जे काय झाले ते तुम्हीच पाहा


Trending: अबब! किती खादाड आहे ही मुलगी? एका मिनीटात खाल्ल 'एवढं' चिकन, रचला विश्वविक्रम


Trending : टॅटू काढणं मॉडेलला पडलं महागात; चेहरा बिघडला, बदललं आयुष्य


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha