Viral Video : पाळीव प्राण्यांचे मनोरंजक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. हे मनोरंजक व्हिडीओ पाहून प्रत्येकजण कधी आनंदी तर कधी आश्चर्यचकीत होताना दिसतो. नुकताच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा पार्क परिसरात खेळताना दिसत आणि उड्या मारताना दिसत आहे.
कुत्रे लवकरच त्यांच्या परिसरातील प्राण्यांसोबत मिसळतात असे अनेकदा दिसून येते. मात्र त्याच वेळी त्यांना त्यांच्या परिसरातील इतर परिसरातील कुत्रे दिसल्यास सहन होत नाही. अशाच परिस्थितीत एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, एका कुत्र्याला इमारतीच्या पार्किंग परिसरामध्ये ठेवलेल्या कपाटातील आरशावर लक्ष जाते. यावेळी त्याला आरशात स्वत:चे प्रतिबिंब दिसते. मात्र हा कुत्रा आरशातील प्रतिबिंबाला पाहून दुसरा कुत्रा असल्याचं समजतो.
सुरुवातीला कुत्र्याला स्वतःचे प्रतिबिंब असल्याचं समजत नाही आणि आरशात दिसलेल्या कुत्र्यावर जोरात भुंकायला सुरुवात करतो. त्याला हाकलण्यासाठी आरशाच्या मागे जाताना दिसतो. यानंतर तो पुन्हा आरशासमोर येऊन स्वतःवरच भुंकताना दिसतो. पुन्हा एकदा कुत्रा दुसऱ्या कुत्र्याला पाहण्यासाठी आरशाच्या मागे जातो.
त्याच वेळी, आरशाच्या मागे तो दुसरा कुत्रा न दिसल्याने खूप दुःखी होतो. सध्या कुत्र्याचीही मस्ती आणि त्याच्यासोबत अनावधानाने झालेल्या प्रॅकचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पाहून यूजर्सना हसू आवरेनाल झालं आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Delhi : चैत्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण दिल्लीत मांसबंदी, महापौरांची घोषणा
- Jammu Kashmir Attack : दहशतवाद्यांचा काश्मिरी पंडितांवर निशाणा, एका दिवसात तिसरा हल्ला
- पत्नीची समजूत घालायला सासरी गेला, पण नाराज पत्नीसह सासरच्यांनी धूधू धुतला; नवऱ्याचा मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha