Viral Video : चहासोबत इतका अत्याचार... एनर्जी ड्रिंक टाकून बनवला चहा; चहाप्रेमी चांगलेच भडकले
Sting Tea Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामुळे चहाप्रेमींचे मनाला नक्कीच वेदना होत असतील. या गुलाबी चहामुळे चहाप्रेमी मात्र चांगलेच संतापले आहेत.
Sting Tea Video : चहा हे असे नाव आहे की जे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणते. हिवाळा असो की उन्हाळा, कट्टर चहाप्रेमींना प्रत्येक ऋतूत चहाचा घोट घ्यावासा वाटतो. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून चहाप्रेमींचे मन दुखू शकते आणि रागही येऊ शकतो. काही दिवसांपूर्वी गुलाबी तंदूरी चिकनची बातमी व्हायरल होत होती. आता गुलाबी चहाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
चहा विक्रेत्याने केले चहासोबत घृणास्पद कृत्य
गुलाबी चहा ऐकल्यावर तुमच्या मनात काश्मिरी चहा येत असेल, पण आम्ही इथे त्या गुलाबी चहाबद्दल बोलत नाही आहोत, इथे आम्ही स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या चहाबद्दल बोलत आहोत. तुम्ही चहामध्ये वेलची, लवंगा, आले आणि मसाले टाकताना पाहिले असेल. पण तुम्ही कधी स्टिंग चहा प्यायला आहे का? वास्तविक, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका रस्त्यावरील चहा विक्रेत्याने चहामध्ये स्टिंग टाकण्यास सुरुवात केली.
View this post on Instagram
चहा बनवण्याच्या सामान्य पद्धतीनुसार, चहा विक्रेत्याने प्रथम भांड्यात दूध ओतले, नंतर चहाची पावडर घालून ढवळले. नंतर साखर टाकली आणि चहा उकळू लागल्यावर त्या व्यक्तीने स्टिंगची बाटली त्यात ओतली. यानंतर चहा फिल्टर करून कपमध्ये भरला. आता त्याची चव काय आणि कशी असेल हे पिणाऱ्यांना माहीत आहे. पण हा थेट चहावर अन्याय असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
चहाप्रेमी संतापले
f4foodi नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेला व्हिडिओ आतापर्यंत 17.9 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर व्हिडिओला 2 लाखांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत यूजर्स व्हिडिओवर आपला राग तीव्रपणे व्यक्त करत आहेत. एकाने लिहिलंय की, या छपऱ्यांनी चहाही सोडला नाही, माफ करा भाऊ. दुसऱ्या यूजरने लिहिले... भाऊ, सर्वांना हॉस्पिटलमध्ये पाठवेल. तर आणखी एकाने लिहिलंय की, तो फक्त विष विकत आहे.
ही बातमी वाचा: