Stayendra Jain Video : सत्येंद्र जैन यांचा नवा व्हिडीओ समोर, मसाज केल्यानंतर 'हे' करताना दिसले जैन, भाजपकडून टीका
Stayendra Jain Video : भाजपकडून हा व्हिडीओ सोशल मीडीयावर पोस्ट करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
Stayendra Jain New Video : मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering) तुरुंगात असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन (Stayendra Jain) यांचा नवा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. भाजपकडून हा व्हिडीओ सोशल मीडीयावर पोस्ट करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
#WATCH | Latest CCTV footage sourced from Tihar jail sources show Delhi Minister Satyendar Jain getting proper food in the jail.
— ANI (@ANI) November 23, 2022
Tihar Jail sources said that Satyendar Jain has gained 8 kg of weight while being in jail, contrary to his lawyer's claims of him having lost 28 kgs. pic.twitter.com/cGEioHh5NM
तिहार जेलमध्ये हॉटेलचे जेवण
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या दिल्लीच्या केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा मसाज करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, सत्येंद्र जैन तिहार जेलमध्ये हॉटेलचे जेवण खाताना दिसत आहेत. भाजपने हा व्हिडिओ जारी केला असून हे तिहार जेल नसून, एखाद्या रिसॉर्टसारखे दिसत असल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी, या व्हायरल व्हिडिओने दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या व्हिडीओवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
जैन यांच्या वकिलांचा 'तो' दावा खोटो?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये कारागृहातील सत्येंद्र जैन यांच्या पलंगावर तीन डब्बे दिसत आहेत. तिन्ही डब्ब्यांमध्ये विविध प्रकारचे पदार्थ ठेवण्यात आले आहेत. यासोबतच सत्येंद्र जैनही फळं खातानाही दिसत आहेत. तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्र जैन यांचे वजन 8 किलोने वाढले आहे, तर तुरुंगात असताना त्यांचे वजन 28 किलोने कमी झाल्याचा दावा त्यांच्या वकिलाने केला होता.
सत्येंद्र जैन यांचा यापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
यापूर्वी सत्येंद्र जैन यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांचा मसाज करण्यात येत असल्याचे दिसले होते. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी त्यांची तब्येत खराब असून डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना फिजिओथेरपी द्यावी, असे सांगितले होते. मात्र तुरुंग अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मालिश करणारा फिजिओथेरपिस्ट नव्हताच, परंतु तो एक आरोपी होता, जो सध्या तुरुंगवास भोगत आहे.
भाजप राजकारण करत असल्याचा आपचा आरोप
सत्येंद्र जैन यांचा मसाजचा व्हिडीओ जारी झाल्यानंतर भाजपाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांना पत्र लिहिले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मसाज व्हिडीओवर पत्रकार परिषद देताना भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. सिसोदिया यांनी दावा केला होता की, सत्येंद्र जैन आजारी असून डॉक्टरांनी त्यांना फिजिओथेरपी करण्यास सांगितले आहे, त्यामुळे त्यांचा मसाज केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या