Trending Video: 'बस याच दिवसासाठी यशस्वी व्हायचंय', वडिलांच्या महागड्या बाईकचं स्वप्न मुलानं केलं पूर्ण
Trending Video: मुले मोठी झाल्यावर आई-वडिलांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा पालक आपल्या मुलांच्या चांगल्या संगोपन आणि शिक्षणाच्या खर्चासमोर त्यांची काही स्वप्ने बाजूला ठेवतात.
Father Son Viral Video: मुले मोठी झाल्यावर आई-वडिलांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा पालक आपल्या मुलांच्या चांगल्या संगोपन आणि शिक्षणाच्या खर्चासमोर त्यांची काही स्वप्ने बाजूला ठेवतात. असाच काहीसा प्रकार एका वडिलांसोबत घडला आहे. ज्यांना आपल्या वडिलांकडे असलेली ड्रीम बाईक खरेदी करायची होती, पण ती महाग असल्याने ते ती बाईक खरेदी करू शकले नाही. मात्र त्यांच्या मुलाने वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आणि त्यांना त्यांची ड्रीम बाईक गिफ्ट म्हणून दिली आहे.
नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुलगा त्याच्या वडिलांना (Father Son Viral Video) त्यांची ड्रीम बाईक गिफ्ट देऊन सरप्राईज करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम युजर "@usidbodypro" ने शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये मुलगा त्याच्या वडिलांना सरप्राईज म्हणून नवीन बाईक देताना दिसत आहे. मुलाने आपली ड्रीम बाईक गिफ्ट केल्यानंतर वडील खूपच भावुक झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. वडिलांच्या प्रतिक्रियेचा हा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
मुलाच्या सरप्राईजमुळे वडील झाले भावूक
आपल्या वडिलांना बाईक गिफ्ट (Father Son Viral Video) करताना व्हिडीओ (Viral Video) पोस्ट करत मुलाने कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, ''वर्षभरापूर्वी मी आणि माझे वडील बाईक शोरूममध्ये गेले होतो. त्यावेळी त्यांना एक बाईक खूप आवडली होती. मात्र ती बाईक महाग असल्याने त्यांना ती विकत घेता येणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी त्या बाईकचा विचार सोडला. याच बाईकचे जुने मॉडेल त्यांचे वडील चालवत होते. म्हणून पण त्यांना ही बाईक खूप आवडत होती. ही त्यांची ड्रीम बाईक होती. जी त्यांना खरेदी करायची होती.'' वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मुलाने वर्षभरानंतर ही बाईक खरेदी केली आणि त्यांना गिफ्ट केली. वडिलांचं स्वप्न पूर्ण कारण्यासारखं दुसरं सुख नाही, असं अनेक नेटकरी या पोस्टवर कमेंट करत म्हणत आहेत. तर एका नेटकाऱ्याने लिहिलं आहे की, ';बस याच दिवसासाठी यशस्वी व्हायचंय.'' हा व्हिडीओ (Viral Video) पाहून अनेक नेटकरी देखील भावुक झाले आहेत. आतापर्यंत 2 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ (Viral Video) पाहिला आहे. या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस सुरूच आहे.