Ratan Tata : ना बॉडीगार्ड, ना लवाजमा; नॅनोमध्ये बसून रतन टाटा पोहोचले ताज हॉटेलमध्ये; नेटकऱ्यांकडून कौतुक
व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी रतन टाटा (Ratan Tata) यांचे कौतुक केलं आहे.
Ratan Tata : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) हे भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यांच्या साधेपणाचे कौतुक अनेक जण करतात. नुकताच रतन टाटा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रतन टाटा हे बॉडीगार्डशिवाय एका नॅनो कारमधून प्रवास करताना दिसत आहेत. एकीकडं सामान्य माणसाला स्वतःसाठी आलिशान कार घ्यायचं स्वप्न असतं, तर दुसरीकडं कोट्यवधींचे मालक असणारे रतन टाटा नॅनोमधून फिरताना दिसत आहेत. या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी रतन टाटा यांचे कौतुक केलं आहे.
2008 साली टाटा कंपनीनं लाँच केलेल्या नॅनो कारनं मिडल क्लास लोकांचं चार चाकीमध्ये फिरण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आज त्याचं नॅनो कारमध्ये बसून बॉडीगार्डशिवाय रतन टाटा हे ताजमध्ये पोहोचले. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं रतन टाटा यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.
विरल भयानीनं शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'आज आमच्या बाबा खान या फॉलोअर्सनं ताज हॉटेल येथे एका थोर व्यक्तीला पाहिलं. ती व्यक्ती म्हणजे रतन टाटा. त्यांच्या आजूबाजूला कोणताही बॉडीगार्ड नव्हता. फक्त त्यांच्यासोबत ताज हॉटेलचे काही कर्मचारी होते.' या व्हिडीओला एक लाख 33 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे.
View this post on Instagram
रतन टाटा यांनी काही दिवसांपूर्वी नॅनो गाडीबाबत एक पोस्ट शेअर केली होती. ही गाडी त्यांच्यासाठी खास आहे, असं त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले होते. या पोस्टमध्ये त्यांनी नॅनो कारच्या लाँच प्रोग्रॅमचा फोटो शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'नॅनो कार ही आपल्या सर्वांची आहे. '
हेही वाचा :