(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चंद्रावर एलियन्स? नासाला अंतराळात दिसलं रहस्यमयी स्पेसशिप
Aliens News : नव्या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा एलियन्सच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. चंद्रावर एलियन्स फिरत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
Nasa Orbiter Captured Spacecraft : अंतराळात (Space) अनेक रहस्य लपलेली आहेत. ती उलगडण्यासाठी विविध देशांतील शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे प्रयत्न करत आहे. अवकाश म्हटलं की, एलियन्सचा (Aliens) विषय निघतोच. अंतराळात इतर ग्रहांवर अनेक परग्रही जीव आहेत, असा दावा केला जातो. या एलियन्स बाबती अनेक दावे-प्रतिदावे केले जातात. मात्र, त्यांच्या अस्तित्वाबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. आता मात्र नासाने चंद्राभोवती फिरणाऱ्या एका रहस्यमयी वस्तूचा फोटो टिपला आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
एलियन्सची नजर आता चंद्रावर?
सोशल मीडियावर अनेकदा एलियन आणि त्याबाबतचे विविध दावे करणारे पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर एलियन्स संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा एलियन्सच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. चंद्रावर एलियन्स फिरत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
चंद्राभोवती फिरतोय UFO?
अनेक सोशल मीडिया पोस्टमधून चंद्राजवळ एलियन्सचं वास्तव्य असल्याचं बोललं जात आहे. चंद्राच्या भोवती फिरणारी रहस्यमयी वस्तू नासाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे चंद्राच्या भोवती एलियन्स फिरत असल्याचे दावे करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसात यासंदर्भात अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान, ही वस्त UFO असल्याची चर्चा आहे.
एलियन्स चंद्रावर उतरण्याच्या तयारीत?
मीडिया रिपोर्टनुसार, सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, अवकाशात फिरणारी एक रहस्यमय वस्तू चंद्राभोवती वेगाने फिरत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ही रहस्यमयी वस्तू चंद्राभोवती फिरून माहिती गोळा करत होती किंवा चंद्रावर उतरण्याची तयारी होती? याबाबत असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. सर्फबोर्डसारखी दिसणारी एक वस्तू चंद्राच्या भोवती फिरताना दिसल्याचं सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे.
चंद्राभोवती रहस्यमयी वस्तू
चंद्राभोवती फिरणाऱ्या या रहस्यमयी वस्तू संदर्भात अनेक दावे केले जात आहेत. ही रहस्यमयी वस्तू स्पेसशिप म्हणजेच उडती तबकडी असल्याचा दावा काहींनी केला आहे. ही रहस्यमयी वस्तू पाहून सोशल मीडियावर लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नासाने टिपलं रहस्यमय वस्तू
अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या एका ऑर्बिटरने चंद्राभोवती वेगाने फिरणाऱ्या या वस्तूचे छायाचित्र टिपलं आहे. मात्र त्याबाबत अधिक माहिती मिळण्यापूर्वीच ती वस्तू कॅमेऱ्यातून गायब झाली. तसेच, नासाच्या ऑर्बिटरने या रहस्यमयी वस्तूचे काही फोटो टिपलेले मात्र, हे फोटो फारसे स्पष्ट नसून धूसर आहेत. त्यामुळे हे रहस्यमयी स्पेसशिप नेमकं काय आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.
चंद्राभोवती फिरणारी वस्तू नेमकी काय?
या नासाच्या ऑर्बिटरने काढलेल्या फोटो दिसणारी रहस्यमयी वस्तू अगदी सर्फबोर्डसारखी दिसत होती. चंद्राजवळ आणखी एक स्पेसशिप पाहिल्यानंतर, शास्त्रज्ञ देखील आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सुरू केला. नासाचे (NASA) Lunar Reconnaissance Orbiter (LRO) चंद्राभोवती सतत प्रदक्षिणा घालत आहे, त्या रहस्यमय वस्तूचा शोध सुरु आहे. नासाने माहिती देत सांगितलं आहे की, चंद्राभोवती रहस्यमयी अंतराळ यान दिसल्यानंतर नासाचे गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर देखील सतर्क झालं आहे.