Trending News : आजच्या काळात, लोकांचे नाते काही महिने आणि काही वर्षांत संपते, मात्र एक जोडप त्यांच्या लग्नाचा 70 वा वाढदिवस साजरा करत आहे. दोघांनीही हा क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी त्यांनी खास फोटोशूट केलं आहे. दोघांनी 1952 मध्ये लग्नाच्या वेळी परिधान केलेल्या कपड्यांमध्ये कपल फोटोशूट केलं आहे.
आपल्या जोडीदारासोबत 70 वर्षे घालवणं सोपे नाही, पण अमेरिकेतील मिनेसोटा येथे राहणाऱ्या एका जोडप्यानं त्यांच्या लग्नाचा 70 वा वाढदिवस साजरा केला. आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांच्या मुलीने दोघांचं खास फोटोशूटची करण्याचं ठरवलं. दोघांनाही स्वतःच्या लग्नातील कपडे घालण्यास सांगितले.
87 वर्षीय नॅन्सी आणि 91 वर्षीय माल्विन त्यांचा 70 वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. या जोडप्याची धाकटी मुलगी प्रोफेशनल फोटोग्राफर आहे, त्यामुळे तिने कपलच्या फोटोशूटसाठी खास तयारी केली होती. फोटोशूट वेळी दोघांनी लग्नातील कपडे घातले होते. 87 वर्षीय नॅन्सी यांनी त्यांचा 70 वर्ष जूना वेडींग गाऊन घातला होता, जो त्या काळी 20 रुपयांना खरेदी केला होता. फोटोंमध्ये पांढऱ्या लेसच्या वेडिंग गाऊनमध्ये नॅन्सी खूपच आनंदी दिसत आहेत.
नॅन्सीला आणि माल्विन यांना 12 नातवंडे आणि 21 नातवंडे आहेत. या सगळ्यांसोबतही दोघांनी फोटोशूट केलं. आजीने 70 वर्षांचा वेडिंग गाऊन घालून फोटोशूट केले तेव्हा संपूर्ण कुटुंबात उत्साह पाहायला मिळाला. दोघांनी कॅमेऱ्यासमोर एकामागून एक पोज दिल्या. त्यांचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यावेळी दोघांनीही 'माफ करा आणि पुढे जा' हा त्यांच्या यशस्वी वैवाहिक जीवनाचा मंत्र असल्याचं सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Viral Video : धक्कादायक! महिलेला जमिनीवर लोळवून केली कोविड टेस्ट, व्हिडीओ व्हायरल
- Viral Video : नवरदेवासमोरच मित्राने चोरले पैसे, वराच्या नकळत घडला प्रकार, तुम्ही व्हिडीओ पाहिला का?
- Viral Video : 'या' आजी-आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क, पाहा भन्नाट व्हिडीओ
- Viral Video : 'पुष्पा' चित्रपटाच्या गाण्यावर आजीचा भन्नाट डान्स, बघून व्हाल थक्क