Trending Video : सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनोरंजन करतात. नेटकरी असे अनेक व्हिडीओ व्हायरल करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक वृद्ध दाम्पत्य सुंदर डान्स करताना दिसत आहेत.


व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आजी-आजोबा गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहेत. या कपलचा डान्स तरुणाईला ही लाजवेल. या कपलचा डान्स पाहून तुम्हांलाही दिसेल की, हे डान्समध्ये किती पटाईत आहे. या आजी-आजोबांनी गाण्याच्या ठेक्यावर मस्त ताल धरत कपल डान्स केला आहे. या दोघांनीही एकमेकांना डान्समध्ये सुंदर साथ दिली आहे.


हा व्हायरल झालेला व्हिडी लग्नाच्या कार्यक्रमामधील आहे. हे कपल ट्रेडीशनल लूकमध्ये पाहायला मिळत आहे. हे कपल डान्स करताना फारच क्यूट दिसत आहे. डान्समध्ये या दोघांचं एकमेकांसाठी असणारं निखळ प्रेम पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ एका इंस्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 






 


वृद्ध दाम्पत्याच्या डान्सचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. अनेक जण कमेंट करत आजी-आजोबांचं कौतुक करत आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ एक लाख 80 हजारांहून अधिक जणांनी पाहिला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :