Viral Video : सध्या देशात लग्नसराई सुरू आहे. बहुतेक विवाहसोहळ्यांमध्ये काही गंमतीशीर घटना पाहायला मिळतात, ज्यामुळे लोकांचं चांगलं मनोरंजन होतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मित्र नवरदेवाच्या गळ्यातील नोटांच्या माळामधून एक नोट चोरताना दिसत आहे.


व्हायरल व्हिडीओमध्ये खाटेवर बसलेल्या एका नवरदेवाच्या गळ्यात नोटांची माळ घातली आहे. त्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळीही वराच्या सभोभोवती बसले आहेत. त्यापैकी वराच्या शेजारी बसलेला एक व्यक्ती नोटांच्या माळातून अतिशय चपळाईने एक नोट चोरतो आणि खिशात ठेवतो. मात्र नवरदेवाला आणि शेजारी बसलेल्या लोकांना याची भनक लागत नाही.


वराच्या नोटांच्या माळातून ही व्यक्ती नोट चोरत असतानाच दूर बसलेला एक व्यक्ती या संपूर्ण घटनेचा कॅमेऱ्यात व्हिडीओ बनवतो. भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्याध विधी आणि परंपरा प्रचलित आहेत. त्यानुसार काही ठिकाणी नवरदेवाला फुलांचे हार घातले जातात आणि काही ठिकाणी नोटांचे हार घातले जातात. या व्हिडीओमध्ये विधीप्रमाणे वराला नोटांची माळ घालण्यात आली होती.






 


इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. नेटकरी हा व्हिडीओ पाहण्याचा आनंद घेत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईकही केलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :