Covid Test Done Forcibly : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. लोक कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रचंड घाबरलेले आहेत. याचं कारण शांघाईमधील व्हायरल होणारे काही व्हिडीओ आहेत. ट्विटरवर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेची जबरदस्तीने कोविड चाचणी करण्यात येत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ चीनच्या शांघायमधील असल्याची चर्चा आहे.


या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक महिला टेस्टिंग सेंटरसमोर जमिनीवर झोपलेली दिसत आहे. महिलेला पकडण्यासाठी एक पुरुषाने तिचे हात धरले आहेत. ही महिला टेस्ट न करण्यासाठी जोरजोरात ओरडताना दिसत आहे, पण पुरुष तिचे हात आणखी घट्ट पकडून आणि गुडघ्यांच्या खाली पकडून ठेवतो. यानंतर पुरुष जबरदस्तीने महिलेचं तोंड उघडतो. 


यानंतर नाईलाजाने महिला तोंड उघडते यावेळी आरोग्य कर्मचारी महिलेचा स्वॅब तपासण्यासाठी घेताना दिसतंय. एबीपा माझा या व्हिडीओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. केवळ व्हायरल माहिती वाचकांपर्यत पोहोचवत आहे. या व्हिडीओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. एका युजरने ट्विट करत म्हटलं आहे की, किती भयावह परिस्थिती आहे. गरीब जनतेचे हाल केले जात आहेत.






हा व्हिडीओ आधी वीबो (Weibo) अ‍ॅपवर पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडीओ ट्विटरवरही प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नक्की कोणत्या ठिकाणचा आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ चीनच्या शांघायमधील असल्याचं बोललं जात आहे. 


बीजिंगमध्ये मेट्रो स्टेशन आणि बस मार्ग बंद 
वाढत्या कोरोनामुळे चीनची राजधानी बीजिंगमध्ये 40 हून अधिक मेट्रो स्थानके आणि 158 बस मार्ग बंद करण्यात आले आहेत. 'द एक्सप्रेस ' एका अहवालात म्हटले आहे की, बहुतेक बंद करण्यात आलेले स्टेशन आणि मार्ग बीजिंगमधील कोरोनाच्या उद्रेकाचं केंद्र असणाऱ्या चाओयांग जिल्ह्यातील आहेत. 


शांघायमध्ये लॉकडाऊन कायम
दरम्यान, शांघायमध्ये लॉकडाऊन अद्याप कायम ठेवण्यात आला आहे. एक महिन्याहून अधिक काळ शांघायमधील लॉकडाऊन आणि कोरोना निर्बंध कठोर करण्यात आलं आहे. कुणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही


महत्त्वाच्या इतर बातम्या :