Viral Video: मिशिगनमध्ये एअर शो दरम्यान मोठा अपघात, ट्रकच्या स्फोटात एकाचा मृत्यू
Michigan Air Show Accident Video: शनिवार 2 जुलै रोजी बॅटल क्रीक, मिशिगन येथे एअर शो आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान जेट- संचालित ट्रकचा स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे.
Michigan Air Show Accident Video: शनिवार 2 जुलै रोजी बॅटल क्रीक, मिशिगन येथे एअर शो आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान जेट- संचालित ट्रकचा स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा एका व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यात ही भयावह घटना दिसत आहे.
40 वर्षीय ख्रिसचा मृत्यू
या घटनेबाबत माहिती देताना स्थानिक पोलिसांनी सांगितले की, मृतक 40 वर्षीय ख्रिस डार्नेल, फ्लाइट एअर शो आणि बलून फेस्टिव्हलच्या बॅटल क्रीक फील्डमध्ये शॉकवेव्ह जेट-ट्रक चालवत होता. पोलिसांनी सांगितले की, ही घटना नेमकी कशी घडली याचा तपास पोलिस, अग्निशमन दल आणि फेडरल एव्हिएशन ऑथॉरिटी करत आहेत.
स्फोटामुळे संपूर्ण मैदान हादरले
ख्रिस डार्नेल हा दोन विमानांच्या खालून आपला जेट-ट्रक चालवत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हा ट्रक तो विमानाच्या गतीने चालवत होता. व्हिडीओत दिसत असल्या प्रमाणे तो दोन विमानांच्या खालून हा जेट-ट्रक चालवत होता. या मैदानात ट्र्क चालवत असताना तो एका विमानाच्या पुढे जाताना दिसतो. ख्रिस जसा विमानाच्या पुढे जातो तितक्यात हा ट्रक पेट घेतो आणि काही अंतरावर जाऊन यात स्फोट होताना या व्हिडीओत दिसत आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की या स्फोटामुळे संपूर्ण मैदान हादरले.
अपघातादरम्यान गोंधळ
या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या व्हिडीओमध्ये भीषण स्फोट झाल्याचे दिसत आहे. ज्यावेळी दुर्घटना घडते त्या वेळी मैदानाभोवती प्रेक्षकांची मोठी गर्दी असते. अपघातादरम्यान येथे गोंधळाचे वातावरण निर्माण होते. लोकांच्या ओरडण्याचा आवाजही या व्हिडीओत ऐकू येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Pakistan Power Crisis : पाकिस्तानमध्ये वीज संकट; इंटरनेट होऊ शकतं बंद, टेलिकॉम ऑपरेटर्सचा इशारा
Right To Abortion : अमेरिकेच्या नव्या निर्णयानंतर गुगलचं मोठ पाऊल, गर्भपात क्लिनिकला भेट देणाऱ्या व्यक्तीची ‘लोकेशन हिस्ट्री’ गुगल हटवणार!