Viral Video: सत्तेची 'नशा'! नियम तोडला म्हणून अडवलं तर भाजप आमदाराच्या मुलीचा पोलिसांवरच रुबाब
Viral Video : वाहतुकीचे नियम तर तोडलाच.... इतकेच नाही तर पोलिसांसोबत आरेरावी करत असलेल्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video : वाहतुकीचे नियम तर तोडलाच.... इतकेच नाही तर पोलिसांसोबत आरेरावी करत असलेल्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत असणारी मुलगी ही आमदाराची गाडी आहे, असं सांगत पोलिसांनी दमात घेत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी मात्र खाकी दाखवत तिच्याकडून दंड वसूल केलाय. हा व्हिडीओ बंगळुरुमधील आहे. आमदाराची मुलगी बीएमडब्ल्यूमधून प्रवास करत होती.. गाडी वेगात होती. सिग्नलही तोडला.. त्यावेळी पोलिसांनी बीएमडब्ल्यू गाडी थांबवली.. त्यानंतर गाडीत असणाऱ्या मुलीने पोलिसांसोबत वाद घातला.. यावेळी उपस्थइत असणाऱ्या स्थानिक पत्रकार आणि कॅमेरामनसोबतही हुज्जत घातल्याचे कळतेय.
प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, बंगळुरुमधील भाजपा आमदार अरविंद निंबावली यांची मुलगी बीएमडब्ल्यू गाडी चालवत होती. वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्याने पोलिसांनी त्या मुलीला रोखलं. त्या बीएमडब्ल्यू चालवणाऱ्या मुलीने सीटबेल्टही लावलेला नव्हता.
पाहा व्हिडीओ....
The real VIP culture of the Bjp. Daughter of MLA in Karnataka ticks off the cops as if she is the CM after violating rules pic.twitter.com/lpUZQCWsf4
— Swati Chaturvedi (@bainjal) June 10, 2022
वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानंतरही त्या मुलीने पोलिसांसोबत वाद घातलाय. तसेच पोलिसांवर दबाव घालण्याचा प्रयत्न केला. “मला जायचं आहे, कार थांबवू नका, ओव्हरटेक केल्याबद्दल तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करु शकत नाही. ही आमदाराची गाडी आहे. आम्ही बेदरकारपणे चालवत नव्हतो. अरविंद निंबावली माझे वडील आहेत,” असं मुलगी पोलिसांना सांगत होती.
मुलीच्या या अरेरावीकडे पोलिसांनी मात्र दुर्लक्ष केलेय. वाद सुरु झाल्यानंतर लोकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी पोलिसांनीही आपली खाकी दाखवली.. या मुलीच्या नावावर नऊ हजारांचा दंड होता.. त्यात पोलिसांनी आणखी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. असे पोलिसांनी त्या मुलीकडून दहा हजार रुपये वसूल केले.