IND vs PAK : संघ दोन, खेळाडू दोन; पण मोबाईलची पसंती एकच, विराट कोहली आणि बाबर आझमचा 'हा' आहे आवडता फोन
World Cup 2023 : पण तुम्हाला माहित आहे की भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम या दोघांची पसंती एकच आहे. कारण या दोघांना एकाच कंपनीचे मोबाईल आवडतात.
मुंबई : ज्या सामन्याची फक्त भारत (India) आणि पाकिस्तानच (Pakistan) नाही तर संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत होतं, तो सामना अखेर आज खेळवला जात आहे. विश्वचषकात (World Cup) पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी आज भारताची लढत होत आहे. पण असं जरी असलं तर या दोन्ही संघातील खेळाडूंची पसंती ही एकच आहे. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यांची आवड आणि पसंती एकच आहे. संघ जरी वेगवेगळे असले तरीही या खेळाडूंची मोबाईलची पसंती एकच आहे. सध्याच्या काळामध्ये या दोघांनी हल्लीच एकाच मोबाईलविषयी भाष्य केलं आहे. कारण या दोघांनाही विवो कंपानीचा मोबाईल फार आवडतात असं या दोघांनी नुकतचं सांगितलं.
विवो कंपनीच्या मोबाईलचं दोघांकडून कौतुक
विवो कंपनीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला त्यांची नवी सिरीज V23 5G चा पाकिस्तानातील ब्रँड अॅम्बेसेडर बनवला होता. तर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्यामुळे या दोघांनीही एकाच कंपनीचे मोबाईल प्रमोट केले आहेत.
काय आहेत याचे फिचर्स?
या मोबाईलच्या अनेक कमाल फिचर्स कौतुक या दोन्ही खेळाडूंनी केलं आहे. विवोच्या या सिरीजमध्ये तुम्हाला Vivo V27 आणि Vivo V27 Pro असे दोन फोन मिळणार आहेत. याचा डिस्प्ले हा 6.78-इंचाचा असून हा 3D वक्र AMOLED आहे. तसेच या रिफ्रेश रेट देखील 120Hz चा असून 1300 पर्यंत कमाल ब्राइटनेस या फोनमधून मिळणार आहे. तर V27 Pro मीडियाटेक डायमेंशन 8200 चिपसेटने सुसज्ज आहे. या फोनमध्ये तुम्हाला 4600mAh बॅटरी मिळते जी 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.
काय आहे याची किंमत?
फोटो-व्हिडिओग्राफीसाठी यात ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल Sony IMX766V कस्टम प्राइमरी रिअर कॅमेरा आहे. सेकंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, तुम्हाला V27 Pro आणि V27 च्या पुढील बाजूस 50-मेगापिक्सेलचा आय ऑटोफोकस कॅमेरा मिळेल. तर या फोनची किंमत ही 37,999 रुपयांपासून सुरू होत असून ती 39,999 ते 42,999 पर्यंत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
हेही वाचा :
IND vs PAK: ...म्हणून मोदी स्टेडियमवर पाकिस्तानी चाहत्यांची संख्या कमी, टीम इंडियाचे सपोर्टर्स अधिक