प्रदुषणात राहिल्याने खरंच 10 सिगारेटइतका धूर शरिरात जातो का? जाणून घ्या
Increasing Pollution: जर आपण सिगारेट ओढली नाही तर आपल्या जीवाला धोका नाही, असं बऱ्याच जणांना वाटत असतं. पण वाढतं प्रदूषण हे तितकंच हानीकारक आहे हे अनेकांना माहीत नसेल.
Delhi NCR Polluted City: जगभरात प्रदूषण (Pollution) ही एक मोठी समस्या बनली आहे. त्यातल्या त्यात भारतातील प्रदूषणाची पातळी ही प्रचंड वाढत आहे, हे टाळण्यासाठी केंद्र सरकार देखील विविध उपाय करत आहे. दिल्ली (Delhi) आणि मुंबईतील (Mumbai) प्रदूषणाच्या पातळीने उच्चांक गाठला आहे, याचा परिणाम माणसांच्या आोग्यावर होतो. तुम्ही जरी सिगारेट पीत नसाल तरी प्रदूषणावाटे जवळपास 10 सिगारेटचा धूर तुमच्या शरीरात जातो. आता ते कसं? तर याबद्दल अधिक जाणून घेऊया.
प्रदूषणावाटे 10 पेक्षा अधिक सिगारेटचा धूर जातो शरिरात
जर आपण 29 ऑक्टोबर, म्हणजेच रविवारबद्दल बोललो तर, ग्रेटर नोएडामधील हवेचा दर्जा निर्देशांक 365 आहे. बर्कले अर्थ सायंटिफिक पेपरच्या अहवालात असं म्हटलं आहे की, एक सिगारेट प्रति घनमीटर 22 मायक्रोग्राम प्रदूषण पसरवते. तुम्हाला अधिक सोप्या भाषेत समजावून सांगायचं झालं तर, तुम्ही या हवेतून दररोज 17 ते 18 सिगारेटचा धूर श्वासावाटे शरिरात घेता. दिल्लीत प्रदूषणामुळे वाईट परिस्थिती आहे.
दिल्लीसह मुंबईचा AQI देखील वाढला आहे, हे पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की तुमच्या आजूबाजूची हवा किती अशुद्ध आहे. जर AQI 500 पेक्षा जास्त वाढला, तर अशा ठिकाणचे लोक दिवसाला एक पाकिट सिगारेटइतका धूर श्वासावाटे शरिरात घेतात. तुम्ही श्वास घेत असलेल्या हवेत फक्त ऑक्सिजनच नाही, तर सिगारेटचा धूरही असतो.
विषारी हवेमुळे तुमचं आयुष्य होतंय कमी
दिल्लीची हवा इतकी विषारी आहे की, त्यामुळे नागरिकांचं सरासरी आयुर्मान जवळपास 17 वर्षांनी कमी झालं आहे, असं एका संशोधनातून समोर आलं. आणखी एक भयावह वस्तुस्थिती म्हणजे, देशातील वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या. विषारी हवेमुळे मृत्यूचे प्रमाण प्रति 1 लाख लोकांमागे 134 होतं, जे जागतिक सरासरीच्या जवळपास 64 टक्के दुप्पट आहे.
प्रदूषण सर्वांसाठीच धोकादायक
एचआयव्ही आणि मलेरियासारख्या प्राणघातक आजारांपेक्षा प्रदूषण अधिक घातक बनलं आहे. प्रदूषणाचा मानवाव्यतिरिक्त पक्षी आणि समुद्री जीवांवरही परिणाम होतो. दरवर्षी प्रदूषणामुळे हजारो जीवांचाही मृत्यू होतो. दरवर्षी प्रदूषण आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत विविध प्रकारचे अहवाल येत राहतात, मात्र त्यातील मृत्यूचे आकडे कमी होण्याऐवजी ते झपाट्याने वाढत आहेत. भारत हे जगातील दुसरं सर्वात प्रदूषित शहर आहे. तर दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये अग्रस्थानी आहे.
हेही वाचा:
Pollution: प्रदूषणामुळे आयुष्य किती वर्षांनी घटतं? उत्तर ऐकून हैराण व्हाल