बाथरुम स्लीपर विकणे आहे, किंमत फक्त 8990 रुपये, Hugo Boss च्या जाहिरातीवर मिम्सचा पाऊस
Hugo Boss या कंपनीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. तसेच ही चप्पलसाठी फक्त 150 रुपये देऊ, असे अनेक नेटकऱ्यांनी म्हटलेय.
Hugo Boss Slippers for ₹19,500 : प्रसिद्ध फॅशन ब्रँड ह्यूगो बॉस (Hugo Boss) या कंपनीची नऊ हजार रुपयांची चप्पल सध्या चर्चेचा विषय आहे. सर्वसामान्य दिसणारी चप्पल महगाडी असल्यामुळे नेटकरी आश्चर्यचकीत झाले असून सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा आहे. काही नेटकऱ्यांनी चप्पल आणि कंपनीवर टीका केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी मिश्किल टिपण्णी करताना ही चप्पल EMI ने घ्यावी लागेल, असे म्हटलेय. नेटकऱ्यांनी Hugo Boss या कंपनीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. तसेच ही चप्पलसाठी फक्त 150 रुपये देऊ, असे अनेक नेटकऱ्यांनी म्हटलेय.
प्रसिद्ध ब्रँड आपले प्रोडक्ट नेहमीच युनिक आयडियासोबत लाँच करतात. युनिक आयडियामुळे असे ब्रँड ग्राहकांच्या पसंतीस उतरतात. पण ह्यूगो बॉस या कंपनीची तुलना नेटकऱ्यांनी बाथरुम चप्पलसोबत केली आहे. सोशल मीडियावर अनेकजण याला बाथरुम चप्पल असा उल्लेख करत आहेत. Darveys या संकेतस्थळावर ह्यूगो बॉस या कंपनीची चप्पल 8990 रुपयांना विकली जात आहे, विशेष म्हणजे यावर 54 टक्के सूट देम्यात आली आहे. या चप्पलची मूळ किंमत 19,500 रुपये इतकी आहे.
Better Than this Shit😬 pic.twitter.com/WxqIk42WNP
— AJAY (@ajay71845) October 17, 2022
डिस्काउंटनंतर 8990 रुपयांना विकली जातेय चप्पल (Credit: Darveys)
— vani (@paneerchillli) October 17, 2022
54% offpic.twitter.com/nCGovIKuQF
— for jzee. (@deekshaaw) October 17, 2022
ह्यूगो बॉसच्या या चप्पलला ट्वीटरवर शेअर केलं आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी कंपनीला ट्रोल केलं आहे. अनेकांनी यावर मिम्स तयार केले आहेत. सोशल मीडियावर सध्या ही चप्पल चर्चेत आहे. काही नेटकऱ्यांनी दुसऱ्या ब्रँड्सचे प्रोडक्टही शेअर करत तुलना केली आहे.
what the actual fuck pic.twitter.com/mvOvNBmCme
— Dew (@itmedew) October 16, 2022
Company must be looking for such buyers only..... pic.twitter.com/0mPzIUuokc
— Patel 🏹 (@Patelshyd) October 18, 2022
एका युजर्सने म्हटलेय की, या चप्पलला फक्त 150 रुपये देणार... तर अन्य एका युजर्सने म्हटलेय की, या चप्पलसाठी 150 रुपयेही जास्त होतात. 9 हजाराच्या चप्पलपेक्षा 100 रुपयांची पॅरागॉन चांगली आहे, असे एका युजर्सने म्हटले आहे. अन्य एका युजर्सने म्हटलेय की, 'कोट्यधीश झालो तरी ही किंमत जास्त आहे.' तिसऱ्या युजर्सने म्हटलेय की भोपाळमध्ये ही चप्पल 89 रुपयांना मिळते.
Better Than this Shit😬 pic.twitter.com/WxqIk42WNP
— AJAY (@ajay71845) October 17, 2022
@shreyaaglitched या ट्वीटर युजर्सने म्हटले की, आई आता 8990 रुपयांच्या चप्पलने मारणार... @Freedom49631748 या ट्वीटर युजरने म्हटलेय की, ही चप्पल घेण्यासाठी EMI चा पर्याय आहे.
8990 complete honetak toot bhi jayegi
— for jzee. (@deekshaaw) October 17, 2022