अंग लगा दे रे... मेट्रोमध्ये तरुणींचा अश्लील डान्स; VIDEO पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल
Delhi Metro Viral Video : मेट्रोमधील दोन मुलींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोन मुली मेट्रोमध्ये आक्षेपाई पद्धतीने रंग खेळताना दिसत आहे.
Delhi Metro Holi Viral Video : सोशल मीडियावर (Socail Media) रोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. कधी रेल्वे आणि बसमधील भांडणाचे व्हिडीओही व्हायरल होतात. त्यातच दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) व्हिडीओ तुफान (Video Viral) व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रो चर्चेत आली आहे. दिल्ली मेट्रो आणि व्हायरल व्हिडीओ हे जणू समीकरणच बनलं आहे. आता होळीच्या निमित्ताने दिल्लीमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी 'अंग लगा दे रे...मोहे रंग लगा दे रे...' या गाण्यावर अश्लील डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
मेट्रोमध्ये तरुणींचं अश्लील कृत्य
दोन तरुणींचा दिल्ली मेट्रोमधील एक अश्लील कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. होळीच्या निमित्ताने या तरुणींना हा व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओमध्ये या दोन्ही तरुणी बॉलिवूडच्या गाण्यावर अश्लील डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे दिल्ली मेट्रो पुन्हा एका चर्चेत आली असून हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यामुळे दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा ठरली आहे. दिल्ली मेट्रो आणि प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतरही दिल्ली मेट्रोमधील भांडणाचे, अश्लील कृत्याचे व्हिडीओ कमी होण्याचं नाव घेत नाहीयत.
व्हिडीओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल
अनेक वेळा दिल्ली मेट्रोमधील अतरंगी आणि विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा दोन तरुणींचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी दिल्ली मेट्रोमध्ये रंगपंचमी खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अतिशय आक्षेपार्ह असल्याचं दिसत आहे. मेट्रो ट्रेनच्या मधील पॅसेजमध्ये या तरुणी बसलेल्या दिसत असून 'अंग लगा दे रे...मोहे रंग लगा दे रे...' या बॉलिवूड गाण्यावर अतिशय आक्षेपार्ह पद्धतीने एकमेकांना रंग लावताना आणि डान्स करताना दिसत आहेत.
'अंग लगा दे रे...मोहे रंग लगा दे रे...
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. चालू मेट्रोमध्ये या दोन तरुणी एकमेकांना रंग लावताना दिसत आहे आणि आक्षेपार्ह कृत्य करताना दिसत असून हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर विविध कमेंट्स करत संताप व्यक्त केला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
मेट्रो ट्रेन में फिल्मी गाने अंग लगा दे.. गाने पर 2 लड़कियों द्वारा एक दूसरे को गुलाल लगाते सेक्सी पोज खूब हो रहा है वायरल. DMRC नही रोक पा रही है लोगो को.. आखिर क्यों ?? आप बतायें क्या करनी चाहिए DMRC को #dmrc #delhimetro #viralvideo pic.twitter.com/cydkAsJ5Bi
— Abhishek Nayan (ABP News) (@Abhisheknayan81) March 23, 2024
दरम्यान, चालू मेट्रोमध्ये या तरुणींनी हा विचित्र व्हिडीओ चित्रीत केल्याचं तुम्ही पाहू शकता. मात्र, कोचमधील इतर प्रवाशांना या कृत्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाहीय. मेट्रो कोचमधील इतर प्रवासी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर युजर्सने या तरुणींचा धारेवर धरत संताप व्यक्त केला आहे.