Viral Video: घाट आहे की मृत्यूची वाट, हिमाचल प्रदेशमधील हा व्हिडीओ पाहून धक्का बसेल
HRTC Bus Viral Video: देव भूमी म्हणून ओळखलं जाणारं भारतातील राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश. हिमाचलर प्रदेश आपल्या पर्यटन स्थळासाठी खूप प्रसिद्ध आहे. देशातून आणि देशाबाहेरील अनेक पर्यटक येथे भेट देत असतात.
HRTC Bus Viral Video: देव भूमी म्हणून ओळखलं जाणारं भारतातील राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश. हिमाचलर प्रदेश आपल्या पर्यटन स्थळासाठी खूप प्रसिद्ध आहे. देशातून आणि देशाबाहेरील अनेक पर्यटक येथे भेट देत असतात. हिमाचल प्रदेश आपल्या उंच पर्वत रांगा, पुरातन मंदिर, सुंदर नदींसाठी जसा ओळखला जातो, तसाच तो ओळखला जातो ते येथील उंच डोंगराला लागून असलेल्या जीवघेण्या रस्त्यांसाठी. येथे काही असे रस्ते आहेत, जेथून प्रवास करताना तुम्हाला जीव मुठीत धरून गाडीच्या सीटवर बसावं लागेल. येथील अशाच एका रस्त्यावरून जाणाऱ्या एका बसला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताना जितकं सुंदर निसर्ग त्यात दिसतं, त्याच वेळी थरारक डोंगर रस्त्याने धावणाऱ्या बसला पाहू अंगावर शहारे येतात.
ट्रॅव्हल भारत नावाच्या एका ट्विटर हँडलने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसत असलेली बस हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची (HRTC) बस आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना ट्रॅव्हल इंडियाने लिहिलं आहे की, ''हिमाचल प्रदेशातील एचआरटीसी बसमध्ये चंबा ते किल्लारपर्यंतचा रोमांचकारी प्रवास.'' या व्हिडीओत दिसत असलेला हा रस्ता हा भारतातील सर्वात धोकादायक रस्ता म्हणून ओळखला जातो. समुद्रसपाटीपासून 4.420 मीटर उंच डोंगरावर हा रस्ता आहे.
ट्विटरवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे ही बस उंच डोंगरावर असलेल्या कमी रुंदीच्या अतिशय धोकादायक रस्त्याने पुढे वाढताना दिसत आहे. हा कच्चा रस्त्या असून या रस्त्याच्या मधोमध एक सुंदर असा धबधबा देखील वाहनात दिसत आहे. याच धबधब्याला पार करून बस पुढे वाढताना दिसत आहे. हा रस्ता इतका लहान आहे की, समोरून अगदी कोणी दुचाकीही घेऊन आला, तर दोघेही अडकू शकतात. तसेच धबधबा पार करता बसवर दगड किंवा पाण्यातून वाहन इतर कोणतीही गोष्ट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा व्हिडीओ पाहताना एकीकडे अंगावर शहारे येतात, तर दुसरीकडे व्हिडीओत निसर्गाचं हे सुदर रूप पाहून मन प्रसन्न होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओ आतापर्यंत तब्बल 1.3 मिलियन लोकांनी पाहिला आहे. तर 3,953 लोकांनी तो शेअर केला असून 27 हजाराहून अधिक लोकांनी हा लाईक केला आहे.
A thrilling ride from Chamba to Killar in a HRTC bus, Himachal Pradesh pic.twitter.com/JHw2JZR6tn
— Traveling Bharat (@TravelingBharat) November 4, 2022