Body Massage: आजकालच्या धावपळीच्या जीवनात बॉडी मसाज (Body Massage) आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. सध्याच्या युगात अनेक जण हे मानसिक तणावाचे (Mental Stress) बळी ठरतात, यातून मार्ग काढण्यासाठी ते अनेक मार्ग देखील शोधतात. बऱ्याच जणांना ऑफिसच्या कामामुळे तणाव येतो, तर बऱ्याच व्यक्तींना वैयक्तिक आयुष्यातील समस्यांमुळे तणाव येतो. अशा वेळी तणाव दूर करण्यायाठी बॉडी मसाज फायदेशीर ठरतो.


मानसिक तणावासह खुर्चीवर बसून सतत काम करत राहिल्याने अनेकांना पाठदुखीची समस्या देखील भेडसावते, ती दूर करण्यासाठी देखील बॉडी मसाज उपयुक्त ठरतो. बॉडी मसाजमुळे तुमचे शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. बॉडी मसाजमुळे डोकेदुखी, स्नायू दुखणे कमी होते. त्यामुळे स्नायूंचा ताण देखील कमी होतो, रक्तदाब नियंत्रणात राहते. बॉडी मसाजचे अनेक गुणकारी फायदे आहेत, बॉडी मसाजची योग्य वेळ कोणती? त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात सविस्तर...


मानसिक आरोग्य सुधारते


बॉडी मसाजमुळे मानसिक आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. यामुळे तणाव आणि चिंता कमी होते. बॉडी मसाज केल्यावर झोप चांगली लागते आणि मानसिक आरोग्य देखील सुधारते.


शरीर तंदुरुस्त राहते


बॉडी मसाज योग्य प्रकारे केल्याने स्नायू मोकळे होतात, ज्यामुळे शारीरिक आरोग्य सुधारते. बॉडी मसाज शरीराला लवचिक आणि तंदुरुस्त बनवते. नियमित बॉडी मसाज केल्याने तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं राहतं आणि विविध शारीरिक समस्या दूर राहतात.


स्नायूंवरचा ताण कमी होतो


बॉडी मसाजमुळे स्नायूंवरचा ताण कमी होतो आणि स्नायूंना आराम मिळतो. बॉडी मसाज शरीरावरील ताण कमी करण्यास आणि शरीर लवचिक बनवण्यास मदत करते. 


तणाव कमी करण्यास मदत मिळते


बॉडी मसाजमुळे मानसिक तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते. बॉडी मसाजमुळे शरीरातील थकवा दूर होतो, ज्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राहतं.


रक्ताभिसरण चांगले होते


बॉडी मसाज केल्यामुळे शरिरारतील रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे तुमच्या शरीराला अधिक ऑक्सिजन आणि पोषण मिळतं. रक्ताभिसरण सुरळीत झाल्यास त्वचा देखील तजेलदार आणि निरोगी राहते.


शरीरावरील जखमांवर उपाय ठरते 


मसाजमुळे शरीरावरील जखमा बऱ्या होतात आणि स्नायू मोकळे झाल्याने जखमांवर उपचार करण्यात मदत होऊ शकते.


बॉडी मसाज कधी करावा?


काही लोकांना सकाळी बॉडी मसाज करायला आवडतं तर काही जणांना रात्री बॉडी मसाज करायला आवडतं. पण रात्री बॉडी मसाज करणं अधिक आरामदायी ठरतं. तरीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार योग्य वेळ निवडू शकता.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Beauty Tips: चाळिशीनंतरही तरुण दिसायचंय? मग नक्की फॉलो करा 'या' टिप्स