Beauty Tips: चाळिशीनंतरही तरुण दिसायचंय? मग नक्की फॉलो करा 'या' टिप्स
चेहऱ्यावरील वृद्धत्व टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा किंवा योगा करा. व्यायाम आणि योगा केल्याने तुमचं वय दिसून येत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेहरा तरुण ठेवण्यासाठी संतुलित आहाराचं सेवन करा आणि भरपूर पाणी प्या.
चाळिशीत आल्यावर त्वचेवर ओलावा टिकून राहत नाही, त्यामुळे त्वचेला मॉइश्चराईज करणं आवश्यक आहे. जेवढी त्वचा मॉइश्चराईज असेल तेवढी ती हेल्दी राहते. चेहरा धुतल्यानंतर किंवा अंघोळीनंतर त्वचेवर मॉइश्चराईझर लावलं पाहिजे.
आठवड्यातून एकदा चेहरा स्क्रब केला पाहिजे. स्क्रब केल्याने त्वचेच्या मृतपेशी निघून जातात आणि त्वचेला चमक येते.
वृद्धत्व टाळायचं असल्यास त्वचेचं सूर्याच्या अतिनील किरणांपासून रक्षण करणं गरजेचे आहे, त्यामुळे किमान एसपीएस 50 असलेल्या सनस्क्रीन वापरा.
त्वचेवरील वृद्धत्व टाळण्यासाठी व्हिटॅमिन सीचा वापर केला पाहिजे. व्हिटॅमिन सी वर भर दिला तर लवकरच चेहऱ्यावर फरक दिसून येईल.
चेहऱ्यावरील वृद्धत्व टाळण्यासाठी चांगली झोप घेणं गरजेचं आहे.
तुम्हाला तजेलदार त्वचा हवी असेल तर चेहरा नियमित क्लीनझिंग करा. हयालूरोनिक ऍसिड हे सेरेमाईड असलेली उत्पादनं निवडा, जे तुमच्या त्वचेवर ओलावा टिकून ठेवण्यास मदत करतील.
चाळिशीत असताना डोळ्यांभोवतीच्या नाजूक त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात. ही समस्या टाळण्यासाठी आय क्रीम किंवा आय सिरमचा वापर करा. रात्री झोपताना ही क्रिम डोळ्यांखाली लावून झोपा.
अल्कोहोल आणि स्मोकिंग टाळल्यास चेहऱ्यावर तेज कायम राहतं आणि सुरकुत्यांची समस्या भेडसावत नाही.