Brass City: भारतातील प्रत्येक शहराला एक इतिहास (History) आहे. काहींना त्यांच्या गजबजलेल्या जीवनशैलीमुळे स्वप्नांच्या शहराचा (Dream City) दर्जा मिळाला आहे, तर काही शहरं त्यांचा इतिहास आणखी काही वेगळ्या पद्धतीने जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत. आता या सगळ्यात भारतात (India) एक असंही शहर आहे, जे 'पितळ नगरी' म्हणून ओळखलं जातं.


भारतातील पितळ नगरीत होणाऱ्या व्यवसायाची किर्ती सर्वदूर पसरली आहे. अमेरिकेपासून (America) युरोपमधून (Europe) येथे बनवल्या जाणाऱ्या वस्तूंना मागणी आहे. जर तुम्हाला भारतातील त्या शहराबद्दल आणि तिथल्या व्यवसायाबद्दल माहिती नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. भारतातील कोणत्या शहराला पितळ नगरी म्हणतात आणि तिथे नेमके कसे व्यवसाय चालतात? हे जाणून घेऊयात...


काय आहे शहराच्या नावामागील इतिहास?


भारतातील मुरादाबाद हे 'पितळ नगरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराचं नाव आहे. हे शहर उत्तर प्रदेश राज्यात येतं. या शहराला एका सरकारी योजनेअंतर्गत 'पितळ नगरी' असं नाव देण्यात आलं. उत्तर प्रदेश सरकारच्या 'एक जिल्हा-एक उत्पादन' योजनेंतर्गत या शहराला हे नाव मिळालं आहे.


या शहरात बनवलेल्या पितळ उत्पादनांमध्ये भारतीय संस्कृती, विविधता, वारसा आणि भारताचा इतिहास दिसून येतो. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद या शहरात पितळ बनवण्याचे छोटे उद्योग आहेत, यासह मोठे कारखाने देखील आहेत. हिंदू देवी-देवतांच्या चित्रांपासून ते मुघल काळातील चित्रं येथे पितळावर कोरली जातात किंवा त्यांच्या मूर्ती बनवल्या जातात.


अमेरिकेपासून युरोपपर्यंत गाजली किर्ती


पितळ नगरीत तयार केलेली उत्पादनं केवळ भारतातच नाही तर, भारताबाहेर देखील विकली जातात. अमेरिकेसारख्या देशातून आणि युरोपसारख्या खंडातून या शहरातील पितळाला मोठी मागणी आहे. जगभरातील विविध ठिकाणी पितळाची निर्यात केली जाते. भारतातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात पितळ निर्यात केलं जातं. जर या उद्योगाच्या आर्थिक व्याप्तीबद्दल बोलायचं झालं, तर जवळपास 8 हजार कोटी ते 9 हजार कोटींची उलाढाल या उद्योगातून होते, जी 2008-09 पर्यंत किमान 20,000 कोटींच्या घरात होती.


पितळ 'या' धातूच्या वस्तूंना हिंदूधर्मियांकडून मोठी मागणी


द वायरमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, मुरादाबाद शहरातील सुमारे 47 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. या मुस्लिमांचं उत्पादनाच्या विविध टप्प्यांवर आणि उत्पादन भूमिकांवर प्रभुत्व आहे. सध्या मुरादाबादमध्ये सुमारे 4,000 पितळ निर्यातदार आहेत. पितळ या धातूच्या वस्तूंना हिंदूधर्मियांकडून मोठी मागणी असते. मुरादाबाद शहरात मन्सूरी, प्रधान, पीतल बस्ती हस्तकला अशा काही संघटना आहेत, ज्या पितळ व्यवसायात अग्रगण्य आहेत आणि लोकप्रिय आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


India: 'इंडिया' नाव बदलून भारत करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च? काय आहे संपूर्ण समीकरण