Video : प्रेम म्हणजे प्रेम असतं... भारतीय पत्नीसाठी चक्क मल्याळम भाषेत लग्नाची वचनं देणारा आफ्रिकन नवरदेव! पाहा व्हिडीओ
Trending News : सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या या व्हिडीओमध्ये आफ्रिकन-अमेरिकन वर भारतीय वधूशी लग्न करताना दिसत आहे.
Trending News : सोशल मीडिया सुरु केला केला की, सध्या अनेक लग्नाचे व्हिडीओ आपलं लक्ष वेधून घेतात. यात केवळ भारतीयच नाही तर, जगभरातील अनेक लग्नांचे भावस्पर्शी व्हिडीओ असतात. यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होतात आणि त्याला लोकांची भरपूर पसंती मिळते. असाच स्वप्नवत लग्न सोहळा आपला ही असावा, असं अनेकांना वाटतं. सध्या परदेशी लग्नातील वधू-वरांचे लग्नातील भावूक क्षण सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. असाच एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील म्हणाल प्रेम म्हणजे प्रेम असतं...
सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या या व्हिडीओमध्ये आफ्रिकन-अमेरिकन वर भारतीय वधूशी लग्न करताना दिसत आहे. या लग्न सोहळ्यात वराने असे एक कृत्य केले की, तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीने त्याचे कौतुक केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये हा आफ्रिकन-अमेरिकन वर भारतीयांची मने जिंकताना दिसत आहे.
नेमकं काय झालं?
या व्हिडीओमधील नवरदेव आफ्रिकन-अमेरिकन आहे. तर, त्याची होणारी पत्नी ही भारतीय आहे. या लग्न सोहळ्यात आपल्या होणाऱ्या पत्नीला खास सरप्राईज देण्यासाठी आणि हा सोहळा आणखी खास बनवण्यासाठी त्याने एक खास गोष्ट केली. यावेळी त्याने चक्क आपल्या होणाऱ्या पत्नीची मातृभाषा अर्थात मल्याळममध्ये लग्नाची वचनं घेतली आहेत. त्याने आपल्या पत्नीसाठी ही वचनं मल्याळी भाषेत लिहून घेतली होती. हे पाहून लग्नात उपस्थित असलेले सर्वजण टाळ्या वाजवून जल्लोष करू लागले.
पाहा व्हिडीओ :
या लग्नाचा हा व्हिडीओ स्वतः वधूने अर्थात जेहोवा ज्युलियन प्रायरने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्या पतीने आमच्या लग्नाची शपथ माझ्या मातृभाषेत मल्याळममध्ये पाठ केली आणि सर्वांसमोर म्हणून देखील दाखवली. हे बघून माझ्या डोळ्यात अश्रू तरळले.’ या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरदेव डॅन्झेल ए. पिरर दोन्ही भाषेत शपथ घेताना दिसत आहे.
संबंधित इतर बातम्या