एक्स्प्लोर

GK: भारतातील शेतकरी इस्रायलला का जातात? 'हे' आहे त्याचं कारण

जमिनीसोबतच इस्रायल हा देश हवेतील शेतीसाठीही ओळखला जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या देशानेही एरोपोनिक्स तंत्रज्ञानाने शेती सुरू केली आहे.

GK: अरब राष्ट्रांमध्ये वसलेला इस्रायल (Israel) हा एक छोटासा देश आज त्याच्या तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जगात एक शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातो. हा देश केवळ संरक्षण क्षेत्रातच नाही, तर कृषी (Farming) क्षेत्रातही पहिल्या क्रमांकावर आहे. इस्रायलमधील कृषी तंत्रज्ञान (Agricultural Technology) इतकं प्रगत आहे की, हा देश समुद्र (Sea) आणि वाळवंटाने (Desert) वेढलेला असूनही तेथील पिकं (Crops) नेहमीच उत्तम दर्जाची येतात. या देशाचं भारतातील शेतकऱ्यांशी (Indian Farmers) नेमकं काय नातं आहे ते जाणून घेऊया.

भारतीय शेतकरी आणि इस्रायल यांचा संबंध

भारत सुरुवातीपासून तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतका पुढे नाही. एक काळ असा होता की, भारतात सर्व काही पारंपरिकपणे केलं जात होतं. शेतीच्या मशागतीपासून ते पीक काढणीपर्यंत सर्वच. जर आधीच्या काळातील शेतीबद्दल बोलायचं झालं, तर जवळपास 100% शेती ही पारंपरिकपणेच केली जात होती, ज्यामुळे भारताला शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं.

पण 1993 मध्ये जेव्हा इस्रायल आणि भारताने कृषी क्षेत्रात हातमिळवणी केली, तेव्हा देशातील शेतकऱ्यांची स्थिती सुधारू लागली. सध्याच्या घडामोडीबद्दल बोलायचं झालं तर, आज भारतात इस्रायलच्या सहकार्याने 30 हून अधिक शेतीशी संबंधित प्रकल्प सुरू आहेत.

भारतातील शेतकरी इस्रायलमध्ये जाऊन घेतात प्रशिक्षण

जे भारतीय शेतकरी इस्रायलमधील तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगत शेती करू इच्छितात, त्यांना इस्रायल देश आमंत्रित करतो. यामुळेच अनेक भारतीय शेतकरी प्रशिक्षणासाठी इस्रायलला जातात आणि शेती प्रशिक्षण घेऊन ते पुन्हा भारतात परततात. भारतात आल्यानंतर ते इस्रायलच्या टेक्निकद्वारे शेती करतात आणि  उत्पादनात अनेक पटींनी वाढ करतात.

सध्या भारतात इस्रायलच्या मदतीने अनेक कृषी प्रशिक्षण केंद्रं चालवली जात आहेत, ज्याद्वारे भारतीय शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानाशी ओळख करुन दिली जाते. याचा फायदा शेतपिकांना होतो, दर्जेदार पिकांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरते.

हवेतही पिकवला जातो भाजीपाला

जमिनीसोबतच हा देश हवेतील शेतीसाठीही ओळखला जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या देशानेही एरोपोनिक्स तंत्रज्ञानाने शेती सुरू केली आहे. या तंत्रात शेतीसाठी जमीन किंवा मातीची आवश्यकता नसते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तंत्राचा वापर करून पिकवलेल्या भाज्या या मातीत पिकवलेल्या भाज्यांप्रमाणेच दर्जेदार असतात.

हेही वाचा:

VIDEO: कॅब बुक नाही झाली म्हणून पठ्ठ्याने झोमॅटोवरुन ऑर्डर केलं जेवण; डिलिव्हरी बॉयच्या बाईकवर बसून पोहोचला घरी

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांवर पैशांचा पाऊस, पाच दिवसात 1.90 लाख कोटींची कमाई, कोणत्या दोन कंपन्यांना फटका?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांवर पैशांचा पाऊस, पाच दिवसात 1.90 लाख कोटींची कमाई, कोणत्या दोन कंपन्यांना फटका?
उद्धव ठाकरेंच्या बैठकीला ओमराजे निंबाळकर गैरहजर, समोर आलं राज'कारण'; धोंडे जेवणामुळे बंडू जाधवही अनुपस्थित
उद्धव ठाकरेंच्या बैठकीला ओमराजे निंबाळकर गैरहजर, समोर आलं राज'कारण'; धोंडे जेवणामुळे बंडू जाधवही अनुपस्थित
Donald Trump : अमेरिका- इराण करारावर आज स्वाक्षरी होणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा,  इराणच्या भूमिकेनं नवा ट्विस्ट...
अमेरिका- इराण करारावर आज स्वाक्षरी होणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराणनं वेगळीच भूमिका मांडली
Rain Updates: पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?
पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांवर पैशांचा पाऊस, पाच दिवसात 1.90 लाख कोटींची कमाई, कोणत्या दोन कंपन्यांना फटका?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांवर पैशांचा पाऊस, पाच दिवसात 1.90 लाख कोटींची कमाई, कोणत्या दोन कंपन्यांना फटका?
उद्धव ठाकरेंच्या बैठकीला ओमराजे निंबाळकर गैरहजर, समोर आलं राज'कारण'; धोंडे जेवणामुळे बंडू जाधवही अनुपस्थित
उद्धव ठाकरेंच्या बैठकीला ओमराजे निंबाळकर गैरहजर, समोर आलं राज'कारण'; धोंडे जेवणामुळे बंडू जाधवही अनुपस्थित
Donald Trump : अमेरिका- इराण करारावर आज स्वाक्षरी होणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा,  इराणच्या भूमिकेनं नवा ट्विस्ट...
अमेरिका- इराण करारावर आज स्वाक्षरी होणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराणनं वेगळीच भूमिका मांडली
Rain Updates: पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?
पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?
Indrayani river Fish : देहूतील इंद्रायणीत मृत माशांचा खच, आषाढी वारीच्या तोंडावर नदी प्रदूषित, वारकऱ्यांच्या जीवाशी कोण खेळतंय?
देहूतील इंद्रायणीत मृत माशांचा खच, आषाढी वारीच्या तोंडावर नदी प्रदूषित, वारकऱ्यांच्या जीवाशी कोण खेळतंय?
Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
Rohit Pawar Protest : रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी....',
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय',
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Embed widget