Sky Cruise Flying Hotel : हवेत तरंगणाऱ्या हॉटेलमधून आकाशाची सफर, 5000 पाहुण्यांची क्षमता, स्वीमिंग पूलसह शॉपिंग मॉलचीही सुविधा
Sky Cruise Flying Hotel : तुम्ही आतापर्यंत थ्री स्टार आणि फाईव्ह स्टार हॉटेलबद्दल ऐकलं असेल, पण कधी फ्लाईंग हॉटेलबाबत ऐकलं नसेल. होय, आम्ही तुम्हाला हवेत उडणाऱ्या हॉटेलबद्दल सांगत आहोत.
Sky Cruise Flying Hotel : तुम्ही आतापर्यंत थ्री स्टार आणि फाईव्ह स्टार हॉटेलबद्दल ऐकलं असेल, पण कधी फ्लाईंग हॉटेलबाबत (Flying Hotel) ऐकलं नसेल. होय, आम्ही तुम्हाला हवेत उडणाऱ्या हॉटेलबद्दल सांगत आहोत. एका इंजिनियरच्या कल्पनेनं या हॉटेलची संकल्पना आखली आहे. या हॉटेलमध्ये सुमारे 5000 प्रवाशांनी आकाशाची सहल करता येणार आहे. इतकं नाही तर या हॉटेलमध्ये राहण्या- खाण्याच्या सोयीसह स्वीमिंग पूल, जिम आणि शॉपिंग मॉलही असणार आहेत. फ्लाईंग हॉटेलचं नाव 'स्काय क्रूझ' (Sky Cruise) आहे. हे फ्लाईंग हॉटोल एखाद्या विशाल जहाज प्रमाणे दिसतं.
खरंतर हे फ्लाईंग हॉटेल अद्याप अस्तित्वात नाही. एका इंजिनियरने या फ्लाईंग हॉटेलची कल्पना केली आणि ती व्हिडीओमध्ये उतरवण्याचं काम एका कलाकारानं केलं आहे. इंजिनीयर हाशिम अल-घैली यानं आपल्या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील फ्लाईंग हॉटेलचा व्हिडीओ शेअर केला आहे. हे हॉटेल सध्या केवळ काल्पनिक आहे. या कल्पनेला ग्राफ्रिक्स आणि अॅनिमेशन च्या मदतीनं व्हिडीओचं रुप देण्यात आलं आहे. पण ही कल्पना भविष्यात सत्यात उतरण्याची शक्यताही दाट आहे.
5000 प्रवाशांना करता येणार प्रवास
आर्टिफिशियल इंडिलिजेंस असलेल्या या काल्पनिक हॉटेलमध्ये 20 इंजिन असतील. एकदा आकाशात उड्डाण केल्यानंतर या विमानाला जमिनीवर उतरण्याचीही गरज भासणार नाही, कारण हे अनेक महिने हवेत उडत राहिल. यामधून सुमारे पाच हजार जणांना हवाई सफर करता येईल.
जमिनीवर उतरण्याची गरज नाही
हे फ्लाईंग हॉटेल आकाशात उडाल्यानंतर याला जमिनीवर उतरण्याची गरज नाही. 'स्काय क्रूझ' हवेत कायम उडत राहिल. इतर विमान कंपन्या त्यांच्या प्रवाशांना या हॉटेलवर आणतील. प्रवाशांची ये-जा करण्यासाठी या विमानावर जागा असेल. तसेच विमानाच्या साहाय्यानेच या हॉटेलवर खाण्या-पिण्याच्या आणि इतर वस्तूंची आयात केली जाईल. त्यामुळे या हॉटेलला जमिनीवर उतरण्याची गरज भासणार नाही.
'स्काय क्रूझ'मध्ये कोणत्या सुविधा असतील?
फ्लाईंग हॉटेल म्हणजेच 'स्काय क्रूझ'मध्ये मॉल, थिएटर, पार्क, स्विमिंग पूल, स्पोर्टस क्लब, गार्डन, बँक्वेट हॉल, व्यायामशाळा अशा सर्व सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय यामध्ये हॉस्पिटल आणि डॉक्टर्स सुद्धा असतील. हे हॉटेल कोणत्याही इंधनावर नाही, तर आण्विक उर्जेवर (Nuclear Reactor) चालेल. यामुळे याला इंधनाची कमतरताही भासणार नाही.
दरम्यान हे फ्लाईंड हॉटेल अद्याप जरी कल्पना असली, तरी येत्या काळात आधुनिक जगात ही कल्पना सत्यात उतरायला वेळ लागणार नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या