विमानातील टॉयलेटवर बसल्यानंतर चुकूनही व्हॅक्यूम बटण दाबू नका, नाहीतर 'या' समस्येला सामोरं जावं लागेल
Airplane Toilet Vacuum System : घरातील टॉयलेटमध्ये नसतात तशा अनेक गोष्टी या विमानातील टॉयलेटमध्ये असतात. त्या ठिकाणी एक व्हॅक्यूम बटनही असतं.
Airplane Toilet Vacuum System : विमान प्रवासादरम्यान विमानातील टॉयलेट वापरणे ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु विमानातील टॉयलेट कशी काम करतात हे तुम्हाला माहिती आहे का? त्या ठिकाणचे व्हॅक्यूम बटण जर तुम्ही चुकून दाबल्यास काय होईल? चला तर याची माहिती घेऊयात
विमानातील टॉयलेट कसे काम करतात?
विमानातील टॉयलेट आपल्या घरातील टॉयलेटपेक्षा खूपच वेगळी असतात. यामध्ये पाण्याऐवजी व्हॅक्यूम प्रणाली वापरली जाते. जेव्हा तुम्ही फ्लश करता तेव्हा व्हॅक्यूम सिस्टिम सर्व घाण एका विशेष टाकीत शोषून घेते. ही टाकी नियमितपणे रिकामी केली जाते.
व्हॅक्यूम फ्लशिंग सिस्टम म्हणजे काय?
व्हॅक्यूम फ्लशिंग सिस्टम सामान्यतः फ्लाइट टॉयलेटमध्ये वापरली जातात. ही प्रणाली पाण्याऐवजी व्हॅक्यूमचा (सक्शन) वापर करते. याचा अर्थ शौचालयातील घाण बाहेर काढण्यासाठी पाण्याचा नव्हे तर हवेचा दाब वापरला जातो. विमानातील जागेअभावी आणि पाण्याची बचत करण्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे.
जेव्हा तुम्ही फ्लाइटचे टॉयलेट वापरता तेव्हा तुम्हाला टॉयलेटचे एक बटण दाबावे लागते ज्याला व्हॅक्यूम बटण म्हणतात. ते दाबल्यावर, फ्लाइटच्या टॉयलेट सिस्टममध्ये बसवण्यात आलेली व्हॅक्यूम टेक्नॉलॉजी घाण बाहेर काढते आणि टॉयलेट स्वच्छ करते. हे बटण दाबणे आवश्यक आहे, जेणेकरून साफसफाईचे काम योग्य प्रकारे करता येईल.
फ्लाइट टॉयलेटवर बसताना व्हॅक्यूम बटण का दाबू नये?
असे म्हणतात की विमानातील टॉयलेटमध्ये सीटवरून उठून ते बंद केल्यानंतरच व्हॅक्यूम बटण दाबावे. तसे न केल्यास हवेच्या दाबामुळे आतील घाण बाहेर येण्याचा धोका असतो. याशिवाय व्हॅक्यूम खेचल्यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
या बातम्या वाचा: