Viral Video : सार्वजनिक ठिकाणी शाळेच्या गणवेशावर मुलांचे अश्लिल चाळे, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Trending News : शाळेच्या गणवेशावर एक मुलगा दोन मुलींसोबत अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
नवी दिल्ली : राजाधानी दिल्लीत (Delhi) सार्वजनिक ठिकाणी अश्लिल चाळे करणं हे हल्ली खूप सर्वसाधारण गोष्ट होत चाललीये. त्यातच आता सोशल मीडियावर (Social Media) देखील अशाच प्रकारचे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना पाहायला मिळतायत. सोशल मीडियावर हल्ली असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असल्याचं चित्र आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा दोन मुलींना किस करत असल्याचं पाहायला मिळतंय. या तीन मुलांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही तिन्ही मुलं शाळकरी असल्याचं देखील या व्हिडिओवरुन स्पष्ट होतंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येतायत. दरम्यान हे प्रकरण कोणत्याही मेट्रोमधलं नसून मेट्रोच्या पुलाखाली सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्याच्या बाजूला हा संपूर्ण प्रकार घडला.
मेट्रोमध्ये अश्लिल आणि विचित्र चाळे करत असल्याचा व्हिडिओ समोर येतात. पण मेट्रोच्या पुलाखाली ही मुलं काही अश्लिल चाळे करत असल्याचा हा व्हिडिओ होतोय. या व्हिडिओमध्ये शाळेच्या गणवेशावर एक मुलगा दोन मुलींना कीस करत असल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडिओ ट्विटरवरुन @Raka440 नावाच्या युजरने शेअर केला आहे. दिल्ली मेट्रोच्या पुलाखाली शाळेच्या गणवेशात अभ्यास सुरु असल्याचं म्हणत या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलंय. आतापर्यंत चार हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. तसेच या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्यात.
Delhi Metro Bridge ke Neeche School Dress me Padhai Chal rha Guys 😐😐
— Raka (@Raka440) November 20, 2023
. pic.twitter.com/zD4t6omvDv
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक तीव्र प्रतिक्रिया देत असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच अनेकांनी या व्हिडीओवर हास्यास्पद प्रतिक्रिया देखील दिल्यात. शहरांमध्ये माणसाचे सर्व गुण नष्ट होत असल्याचं एका युजरनी म्हटलं, तर दुसऱ्या युजरनी म्हटलं की, हे त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन आहे.
सोशल मीडियावर अनेकदा काही अश्लिल चाळे करत असल्याचं व्हिडिओ सर्रास व्हायरल होतात. पण या शाळकरी मुलांच्या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जातायत. दरम्यान या मुलांनी शाळेच्या गणवेशावर अशा प्रकारचं कृत्य केल्याने पालक वर्गातून देखील मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय.