Custom Fines Women: अबब! महिला विमान प्रवासात सँडविच खायला विसरली अन् भरावा लागला लाखभर रुपयांचा दडं, ऑस्ट्रेलियाच्या विमानतळावर नेमकं काय घडलं?
Trending News : न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेला सँडविच खरेदी करून ते न खाणे चांगलेच महागात पडले. सँडविचमुळे या महिलेला एक लाख रुपयांपेक्षा जास्त दंड भरावा लागला.
मुंबई : तुम्ही विमानतळावरील कस्टम विभागाविषयी (Coustom Department) तर ऐकलचं असले आणि त्या विभागाच्या कामाविषयी देखील तुम्हाला चांगलंच माहित असेल. पण न्यूझीलंडमध्ये (New Zealand) अशी एक घटना घडली ज्यामुळे तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. एका सँडविचमुळे (Sandwich) एका महिलेला कस्टम विभागाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे एका सँडविचसाठी या महिलेला तब्बल 1 लाख 60 हजार रुपयांचा दंड भरावा लागला.
अहवालानुसार, न्यूझीलँडवरुन एक महिला जेव्हा ऑस्ट्रेलियाला पोहचली तेव्हा तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. तिच्याकडे सँडविच होते, जे खायला ती विसरली. त्यामुळे तिला हा दंड भरावा लागला. खरतंर विमानातून प्रवास करताना तुमच्याकडे ज्या काही गोष्टी असतली त्या तुम्हाला कस्टम डिक्लेरेशन फॉर्ममध्ये भराव्या लागतात. त्या फॉर्ममध्ये नमूद न केलेल्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तर त्यासाठी तुम्हाला दंड आकारण्यात येतो. नेमकी हीच गोष्ट या महिलेसोबत झाली.
आणि तिला 1 लाख 64 हजार रुपयांचा दंड ठोठावला
ही महिला न्यूझीलंडची असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान ही महिला न्यूझीलंडवरुन ऑस्ट्रेलियासाठी प्रवास करत होती. या महिलेचं वय 77 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. या महिलेने न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च विमानतळावर ग्लूटेन-फ्री चिकन आणि सॅलड सँडविच घेतले होते. विमानातून उतरताना तिची बॅग तपासण्यात आली. त्यावेळी तिच्या बॅगमध्ये हे सँडविच सापडले. त्यामुळे तिला 1 लाख 64 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
म्हणून आकारण्यात आला दडं
माहितीनुसार, ही महिला न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च ते ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन दरम्यान प्रवास करत होती. या प्रवासात खाण्यासाठी तिने ग्लूटेन-फ्री चिकन आणि सॅलड सँडविच पॅक केले होते. साडेतीन तासांचा तिचा हा प्रवास होता. पण या प्रवासात ती ते सँडविच खायला विसरली. ब्रिस्बेनला पोहोचल्यावर तिने कस्टम डिक्लेरेशन फॉर्म पूर्ण केला. पण त्या फॉर्ममध्ये ही महिला सँडविचविषयी लिहीण्यास विसरली. त्यानंतर तिची बॅग तपासण्यात आली आणि तिच्या बॅगमध्ये हे सँडविच आढळले.
कस्टम डिक्लेरेशन फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती न दिल्याने अधिकाऱ्यांनी या महिलेवर दंडात्मक कारवाई केली. तीन हजार ऑस्ट्रेलियन डॉलर या महिलेला दंड म्हणून आकारण्यात आले. भारतीय रुपयांमध्ये हे 1 लाख 64 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. दरम्यान या महिलेला विसरण्याची समस्या असल्याचं देखील अहवालातून समोर आलं आहे.