Trending News : भारतामधील अनेक राज्यांमध्ये सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. अनेक लोक उन्हामुळे घराबाहेर जाणं टाळत आहेत. पण ज्या लोकांना घराबाहेर पडून काम करावं लागत आहेत, त्यांना मात्र उन्हामुळे होणाऱ्या समस्या जाणवत आहेत. उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी एका रिक्षा चालकानं एक देसी जुगाड केला आहे.
देशभरात सतत वाढत असलेल्या तापमानामुळे उष्णतेपासून वाचण्यासाठी लोक नवनवीन उपाय शोधत आहेत. दिल्लीतील महेंद्र कुमार या ऑटो चालकाने आपल्या प्रवाशांना आणि स्वतःला या कडक उन्हापासून वाचवण्यासाठी एक नवीन मार्ग शोधला आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये त्याच्या रिक्षावर गार्डन दिसत आहे. हा रिक्षा चालक नवी दिल्ली येथे रिक्षा चालवतो.
महेंद्र कुमार यांची ही छोटीशी बाग त्यांचे आणि प्रवाशांचे प्रवासादरम्यान सूर्यप्रकाशापासून संरक्षण करते. तसेच रिक्षावरील छतावर असणाऱ्या या झाडांमुळे रिक्षामधील तापमानही कमी राहते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, महेंद्र यांनी त्याच्या ऑटोच्या छतावर एकूण 25 प्रकारची झाडे लावली आहेत. ज्यामध्ये टोमॅटो, भेंडी, पालक यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, ऑटोमधील तापमान कमी राहावे यासाठी त्यांनी ऑटोच्या आत एक छोटा पंखाही बसवला आहे. त्यांनी केलेल्या या देसी जुगाडाचं अनेक लोक कौतुक करत आहेत. त्यांच्या सोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीला नेटकऱ्यांची देखील पसंती मिळत आहे.
महेंद्र यांच्या या ऑटो गार्डनमध्ये फिरण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात. अनेक लोक या रिक्षाचे फोटो काढतात. तसेच महेंद्र यांच्यासोबत काही लोक सेल्फी देखील काढतात. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या मते, मार्च 2022 हा भारताच्या इतिहासातील सर्वात उष्ण महिना ठरला आहे. त्यामुळे उन्हापासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी अनेकांना महेंद्र यांच्यासारखी झाडांची लागवड करावी लागणार आहे. झाडे लावली तर उष्णतेचे प्रमाण कमी होते.
हेही वाचा :