(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : भरधाव ओझं वाहून नेणाऱ्या रिक्षाचालकाची बसचालकाने केली मदत; व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले
Viral Video : नुकताच सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक बस चालक रस्त्यावर ओझे वाहून नेणाऱ्या ट्रॉलीला मदत करताना दिसत आहे.
Viral Video : सोशल मीडियावर अनेकदा भावनिक व्हिडीओ समोर येत असतात. या व्हिडीओमध्ये माणुसकी जपत, सामाजिक भावनेने एकमेकांची मदत केली जाते. आणि हे व्हिडीओ यूजर्सना अत्यंत भावनिक वाटतात. तसेच या व्हिडीओला चांगली पसंती देखील मिळते. या व्हिडीओच्या माध्यमातून अनेकजण सकारात्मक प्रेरणादेखील घेतात. सोशल मीडियावर नुकताच असा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मदतीचा हात समोर करण्यात आला आहे.
रस्त्यावर अनेकदा आपल्याला वेगाने ये-जा करणाऱ्या वाहनांबरोबरच काही गरीब, कामगार लोक हातगाडीवरून, ट्रॉलीवरून अवजड सामान वाहून नेताना दिसतात. या कामावरच त्यांचा उदरनिर्वाह असतो. यादरम्यान वाटेत एखादी चढण आल्यास अशा लोकांना ट्रॉली वाहून नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर येत असतात. यामध्ये दुचाकीस्वार अशा गाड्यांना मदत करताना दिसतात.
नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक बस चालक रस्त्यावर भार वाहून नेणाऱ्या ट्रॉलीला मदत करताना दिसत आहे. या दरम्यान बस चालक आपल्या बसमधून ट्रॉली हळूहळू ढकलून ट्रॉलीला मदत करताना दिसतो. जे पाहून सोशल मीडियावर सर्वांनाच या गाडीचे कौतुक वाटत आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बसचा चालकही त्याच्या बसच्या वेगामुळे ट्रॉली उलटी होणार नाही याची काळजी घेताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या कमेंटमध्ये यूजर्स बस ड्रायव्हरचे कौतुक करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
Viral Video : रस्त्यावर धुम्रपान केल्याची मिळाली कडक शिक्षा, व्हिडीओ पाहून हसू आवरता येणार नाही