Python: ऑस्ट्रेलियातील घरावर चढला तब्बल 16 फुटांचा अजगर; नागरिकांची तारांबळ, पाहा थरकाप उडवणारा व्हायरल व्हिडीओ
Carpet Python: ऑस्ट्रेलियाच्या एका शहरातील घरावर तब्बल 16 फुटांचा अजगर चढताना दिसला. हे भयानक दृश्य पाहून घरातील लोकहमुलांनी घाबरुन जोरजोरात रडायला सुरुवात केली.
![Python: ऑस्ट्रेलियातील घरावर चढला तब्बल 16 फुटांचा अजगर; नागरिकांची तारांबळ, पाहा थरकाप उडवणारा व्हायरल व्हिडीओ Australia python on home watch 16 feel python slithers across homes roof in australia stuns people in locality Python: ऑस्ट्रेलियातील घरावर चढला तब्बल 16 फुटांचा अजगर; नागरिकांची तारांबळ, पाहा थरकाप उडवणारा व्हायरल व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/30/c47ab4b2c1860d63de9dafbe2ce83e881693405928135713_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
क्विन्सलँड, ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड (Queensland) शहरात राहणाऱ्या एका कुटुंबियांसोबत भयानक प्रकार घडला, ज्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. क्विन्सलँडमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरावर 16 फूट लांबीचा महाकाय अजगर (Python) चढला, हे थरारक दृश्य पाहून घरातील लहान मुलंही घाबरुन ओरडायला लागली आणि त्यानंतर घरातील सर्वांनी जीव वाचवण्यासाठी तातडीने घराबाहेर धाव घेतली. सध्या या थरारक आणि धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलात व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हायरल व्हिडिओ शेअर करत त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
जीवाच्या आकांताने घरातल्यांनी काढला बाहेर पळ
ऑस्ट्रेलियात साप किंवा अजगर रस्त्यांवर आणि घरात निघणं ही अगदी सामान्य बाब आहे. यापूर्वी अनेकदा ऑस्ट्रेलियातील विविध शहरांतील रस्त्यांवर सरपटणाऱ्या सापांचं आणि अन्य जीवांचं दर्शन नागरिकांना झालं आहे. परंतु क्विन्सलँडमधील एका घरावर तब्बल 16 फुटांचा अजगर चढल्याने परिसरात खळबळ पसरली. घरातील लोकांना अजगर छतावर चढल्याचं समजताच त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. या घटनेचा व्हिडीओ खरंच अंगाचा थरकाप उडवणारा आहे.
Normal things in Australia pic.twitter.com/KW3oN8zIwO
— Levandov (@Levandov_2) August 27, 2023
जमलेल्या लोकांचाही उडाला थरकाप
घरातील लहान मुलांना जेव्हा आपल्या घरावर भला मोठी अजगर सरपटताना दिसला तेव्हा त्यांनी घाबरुन किंकाळी फोडणं सुरू केलं, जोरजोरात रडणं सुरू केलं. परिसरातील इतरांना घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अजगर पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने अजगराचा व्हिडिओ शूट केला आणि आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला. अवघ्या काही मिनिटांतच हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. घराच्या छतावर चढलेला हा लांब अजगर जमलेल्या लोकांकडे पाहत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं. अजगर लोकांच्या दिशेने येण्याचाही प्रयत्न करत होता आणि त्यामुळे जमलेल्या लोकांनी घाबरून आरडाओरड सुरू केली.
सुदैवाने अजगराचा कुणावरही हल्ला नाही
ज्या घरावर हा महाकाय अजगर चढला, त्या घराच्या आजूबाजूला बरीचशी झाडं आहेत आणि त्यावरुन हा अजगर घरावर चढला. हा अजगर घराच्या छतावरुन निघून पुढे लगतच्या झाडांभोवती आपली मान गुंफत होता. सुदैवाने या भल्या मोठ्या अजगराने कुणावरही हल्ला केला नाही. ज्या छतावर हा बलाढ्य अजगर चढला होता, ते घर सध्या नागरिकांनी खाली केलं आहे आणि या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
हेही वाचा:
Chandrayaan 3: चंद्रावर विक्रम लँडरचं फोटोशुट; प्रज्ञान रोव्हरने काढले 'विक्रम लँडर'चे फोटो, पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)