विमानांचं गाव! ज्या गावात प्रत्येकाकडं स्वतःचं विमान; कुठल्या देशात आहे हे भन्नाट गाव...- वाचा
Fly-In Community: जगात असे एक ठिकाण आहे, जिथे विमानाने प्रवास करणे इतके सामान्य आहे की लोकांचे स्वतःचे विमान आहे. होय, तुमचा विश्वास बसणार नाही, पण जगातील एका गावात बहुतेक लोकांकडे विमान आहे.
Fly-In Community: लहानपणी आणि आताही जेव्हा कधी आकाशात विमान (Airplane) उडताना दिसतं, तेव्हा अनेकजण ते पाहण्यासाठी घरातून बाहेर येतात. तर काही वर डोकं वर करून पाहतात. विमान (Airplane) हे माणसाला सर्वाधिक आकर्षित करणारं वाहन आहे. यातच आपल्या देशाच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग असा आहे, जो आजपर्यंत विमानात कधीही बसला नाही. त्यामुळे विमानात प्रवास करणे आपल्या देशात आजही अत्यंत कठिण मानले जाते. अशा परिस्थितीत जर कोणी विमान खरेदी केले तर ती मोठी गोष्ट आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की जगात असे एक ठिकाण आहे, जिथे विमानाने प्रवास करणे इतके सामान्य आहे की लोकांचे स्वतःचे विमान आहे. होय, तुमचा विश्वास बसणार नाही, पण जगातील एका गावात बहुतेक लोकांकडे विमान आहे. येथे लोक त्यांचे दैनंदिन काम विमानातूनच करतात आणि विमाने घराबाहेर गाड्यांसारखी उभी असतात.
इथे प्रत्येक घराबाहेर विमाने उभी असतात. येथे विमान खरेदी करणे म्हणजे कार खरेदी कारण्यासारखं आहे. त्यामुळेच येथे बांधण्यात आलेल्या घरांची रचनाही अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, त्यामध्ये विमान सहज पार्क करता येईल. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, या गावातील नेमकं चित्र कसं असेल, कारण येथे विमान आणि कार हे दोन्ही एकाच रस्त्यावर धावताना दिसतात. नेमकं कोणत्या देशातील आहे हे गाव, हे जाणून घेऊ...
अर्ध्याहून अधिक घरांमध्ये हँगर्स बनवले जातात
स्प्रूस क्रीक (Spruce Creek ) हे अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यमधील एक गाव आहे. या गावाला निवासी विमानतळ असेही म्हणतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे सुमारे 5,000 लोक राहतात आणि 1,300 घरे आहेत. या गावात सुमारे 700 घरांमध्ये हँगर्स आहेत. विमान जेथे उभे असते त्या जागेला हँगर म्हणतात. इथे गाड्यांसाठी गॅरेज बनवण्याऐवजी लोक त्यांच्या घरात हँगर बनवतात आणि त्यांची विमाने तिथे उभी असतात. विमान टेक ऑफ करण्यासाठी गावापासून हाकेच्या अंतरावर धावपट्टी आहे.
नाश्ता करण्यासाठीही लोक विमानाने जातात
मिळालेल्या माहितीनुसार, गावात राहणारे बहुतेक लोक व्यावसायिक वैमानिक आहेत. म्हणूनच येथे विमान असणे सामान्य आहे. याशिवाय गावात डॉक्टर, वकील आदी आहेत. या लोकांना विमान ठेवण्याचाही शौक असतो. इथल्या लोकांना विमानाची इतकी आवड आहे की, दर शनिवारी सकाळी ते धावपट्टीवर जमतात आणि स्थानिक विमानतळावर जाऊन नाश्ता करतात. हे लोक याला aturday Morning Gaggle म्हणतात.
दरम्यान, स्प्रूस क्रीक हे अमेरिकेतील एकमेव ठिकाण नाही जिथे विमान असणे सामान्य आहे. अमेरिकेतील अॅरिझोना, कोलोरॅडो, फ्लोरिडा, टेक्सास, वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्नियामध्ये अशी अनेक गावे किंवा समुदाय आहेत, जिथे लोकांची स्वतःची विमाने आहेत. येथे 600 हून अधिक फ्लाय-इन समुदाय आहेत, त्यापैकी स्प्रूस क्रीक हा सर्वात मोठा फ्लाय-इन समुदाय आहे.