1. ABP Majha Top 10, 8 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Eknath Shinde : राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण

    Mumbai : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) कोकण प्रांत प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली. Read More

  3. Housing : कोण म्हणतंय मंदी आहे? गुरुग्राममध्ये अवघ्या तीनच दिवसात 7,200 कोटी रुपयांच्या 1,113 आलिशान घरांची विक्री, अनिवासी भारतीयांची मोठी गुंतवणूक

    Luxury Housing : देशात दीर्घकाळापासून आलिशान घरांची मागणी झपाट्याने वाढत आहे. असंच एक दृश्य गुरूग्राममध्ये पाहायला मिळाले. या ठिकाणच्या आलिशान गृहनिर्माण प्रकल्पात लोकांनी मोठी खरेदी केली. Read More

  4. Israel Palestine conflict : इस्रायलचा हिजबुल्लाहवर मोठा वार, सिनियर रँकचा कंमाडो ठार; लेबनॉनमध्ये युद्ध पेटणार?

    Israel Palestine conflict : इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा कमांडर ठार झाला असल्याचे वृत्त आहे. Read More

  5. Ajit Pawar : 'सत्यशोधक' चित्रपटाला करसवलत देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे अजित पवारांचे निर्देश

    Satyashodhak : क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्व, अलौकिक कार्याला न्याय देणारे असेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला. Read More

  6. Kangana Ranaut : लक्षद्वीप-मालदीव वादात आता कंगणा राणावतनेही घेतली उडी; म्हणाली, "आत्मनिर्भर भारत"

    Kangana Ranaut : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काही दिवसांपूर्वी लक्षद्वीप दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावर संपूर्ण देशाच्या नजरा होत्या. पीएम मोदींचे लक्षद्वीपमधील (Lakshadweep) फोटो तुफान व्हायरल झाले. Read More

  7. ICC Men's Player of the Month : 'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ'साठी विश्वविजेत्या कर्णधारासह दोघांना नामांकन

    ICC Men's Player of the Month : 'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ'साठी विश्वविजेता कर्णधार पॅट कमिंस (Pat Cummins) याला नामांकन मिळाले आहे. पॅट कमिंसशिवाय बांगलादेशचा गोलंदाज तैजुल इस्लाम आणि न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलीप्स यांना नामांकन मिळालय. Read More

  8. Riyan Parag Century : आयपीएलपूर्वी रियान परागचा धमाका, रणजीच्या इतिहासात दुसरे सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा पराक्रम

    Riyan Parag Century : रियान परागने 87 चेंडूत 155 धावा केल्या. त्याने आपल्या झंझावाती खेळीत 11 चौकार आणि 12 षटकार मारले. मात्र, या सामन्यात रियान परागच्या संघ आसामला पराभवाचा सामना करावा लागला. Read More

  9. Self Confidence : स्वत:ला कधीही समजू नका कमी; 'या' 5 टिप्स वाढवतील तुमचा आत्मविश्वास

    Self Confidence : जीवनात पुढे जायचं असेल किंवा एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. परंतु बऱ्याचदा स्वत:ची तुलना दुसऱ्यासोबत करुन आपण आत्मविश्वास गमावून बसतो. Read More

  10. Aadhaar Card Without Biometric : सरकारची मोठी घोषणा! बायोमेट्रिक्सशिवाय बनवा आधार कार्ड, जाणून घ्या कसा करायचा अर्ज

    Aadhaar Card Without Biometric : बायोमेट्रिक तपशीलाशिवाय 29 लाख लोकांना आधार कार्ड जारी करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. याचाच अर्थ तुम्ही फिंगरप्रिंट आणि आयरिश स्कॅनशिवाय आधार कार्ड बनवू शकता. Read More