Kangana Ranaut : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काही दिवसांपूर्वी लक्षद्वीप दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावर संपूर्ण देशाच्या नजरा होत्या. पीएम मोदींचे लक्षद्वीपमधील (Lakshadweep) फोटो तुफान व्हायरल झाले. त्यानंतर मालदीवमधील (Maldieves) नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पीएम मोदींच्या फोटोवर अपमानित करणाऱ्या कमेंट्स केल्या. दरम्यान आता सोशल मीडियावर लक्षद्वीपच्या समर्थनार्थ अनेक लोक बोलत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लक्षद्वीपला पाठिंबा दर्शवलाय. यामध्ये कंगणा राणावतही मागे राहिलेली नाही. तिनेही याबाबत प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींना पाठिंबा दर्शवलाय.
कंगणा राणावत म्हणाली, "पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लक्षद्वीपमध्ये (Lakshadweep) पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मालदीवमधील काही लोक यावर ज्यापद्धतीने व्यक्त होत आहेत, ते चुकीचे आहे. सर्वप्रथम मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या देशाचाच प्रचार केलाय. फक्त लक्षद्वीसाठीच नाही. तर संपूर्ण देशासाठीचं ते काम करतात. ते सर्वांनाच सांगत आहेत की, भारतातच विवाह करा. ते भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे काही मालदीवमधील पर्यटन कमी होणार नाही."
आपल्या देशाला प्रमोट केले, म्हणून इतर देशाचे पर्यटन कमी होणार नाही.
कंगणा पुढे बोलताना म्हणाली, "जर लोक काश्मीरला जात असतील. तर याचा अर्थ असा नाही की, मनालीतील पर्यटन कमी होईल. पीएम मोदी अधिकाधिक लोकांना प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. यामुळे दुसऱ्या देशांतील पर्यटन कमी होणार नाही. सध्याच्या युगात लोक प्रत्येक ठिकाणी जाऊ इच्छितात. मोदी भारतातील पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लक्षद्वीपला (Lakshadweep) प्रमोट करत आहेत. याचा अर्थ मालदीव चांगले नाही , असा होत नाही.
भारतातील निसर्गाचे कंगणाकडून कौतुक
भारतातील पर्यटनाबाबत कंगणा म्हणाली, मला वाटते की भारत फार सुंदर आहे. त्यामुळे आपल्याला सृष्टीतील निसर्गाचे दर्शन घडवते. ही फक्त पर्यटनासाठीच नाही तर विवाह याच ठिकाणी करण्यासाठी देखील चांगली आहे.
पर्यटनाव्यतिरिक्त मालदीव या बाबींमध्येही भारतावर अवलंबून
2021 च्या आकडेवारीनुसार, या वर्षी भारत मालदीवचा (Maldieves) तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार म्हणून उदयास आला आहे. हे बेट प्रामुख्याने भारतातून धातू आयात करते. एवढेच नाही तर भारत मालदीवमध्ये विविध प्रकारच्या अभियांत्रिकी आणि औद्योगिक उत्पादनांची निर्यात करतो. त्यामध्ये फार्मास्युटिकल्स, रडार उपकरणे, रॉक बोल्डर्स, सिमेंट. त्यात तांदूळ, मसाले, फळे, भाजीपाला आणि पोल्ट्री उत्पादनांसारख्या कृषी उत्पादनांचाही समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या