Self Confidence : मानसिक आरोग्यासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मविश्वास (Self Confidence) खूप महत्त्वाचा आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. पण बरेच लोक हे खूप लाजाळू असतात. लाजाळू असण्यासोबतच त्यांना लोकांशी बोलतानाही भीती किंवा एखाद्याशी कसं बोलावं हा विचार त्यांना पडतो. अशा सर्व विचारांमुळे ते कोणतंही काम करताना कचरतात आणि त्यामुळे ते कोणतंही काम नीट करू शकत नाहीत आणि जीवनात पुढेही जाऊ शकत नाहीत. आत्मविश्वास कमी असलेल्या लोकांना स्टेजवर जाऊन एखाद्यासमोर बोलण्यात किंवा प्रेझेंटेशन देण्यात खूप अडचणी येतात, पण याउलट आत्मविश्वास असलेल्या लोकांसाठी हे काम अगदी सोपं असतं. 


आत्मविश्वास कसा वाढवावा?


जास्त विचार करणं सोडा


जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर अतिविचार करण्याची सवय सोडा. जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुम्ही गोष्टींचा अतिविचार करण्याची सवय सोडली पाहिजे. कारण निरर्थक गोष्टींचा विचार करण्याची सवय तुम्हाला पुढे जाऊ देत नाही आणि तुमची प्रगती थांबवते. निरर्थक गोष्टींबद्दल विचार करण्यात तुमची ऊर्जा वाया घालवण्याऐवजी सकारात्मक आत्मपरीक्षण करा आणि चांगल्या गोष्टींचा विचार करा.


लहान पावलं उचला आणि गोष्टींचा सराव करा


लहान पावलं उचलणं म्हणजे व्यायामापूर्वी वॉर्म अप करण्यासारखं आहे. जे ध्येय तुम्हाला गाठायचं आहे ते साध्य करण्यासाठी छोटे छोटे प्रयत्न करत राहा. तुम्हाला जे मिळवायचं आहे त्याच्या दिशेने हळू हळू पुढे जा. प्रथम स्टेजवर जाऊन भाषण करण्याऐवजी तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये बसून बोलण्याची सवय लावा, एखाद्या गोष्टीवर चर्चा करा. अशाप्रकारे तुम्ही कोणतीही भीती न बाळगता सतत सराव करत राहा.


स्वतःची तुलना इतरांशी करू नका


दुसऱ्याच्या जीवनशैलीची आणि विचारांची तुलना स्वत:शी करू नका. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक असा गुण असतो, ज्यामुळे तो व्यक्ती इतरांपेक्षा वेगळा ठरतो. पण जर आपण स्वतःची किंवा आपल्या कामाची तुलना दुसऱ्या कोणाशी केली तर त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो.


स्वतःवर विश्वास ठेवा


आयुष्यात काही मिळवायचं असेल तर स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जर आपला स्वतःवर विश्वास असेल तरच आपण आपले विचार इतरांसमोर ठामपणे मांडू शकतो आणि समजावून सांगू शकतो.


धीर धरा


आत्मविश्वास एका रात्रीत वाढत नाही हे लक्षात ठेवा. ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला संयमाने काम करावं लागतं आणि ते एकाच वेळी साध्य होत नाही, त्यासाठी व्यक्तीला सतत प्रयत्न करावे लागतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


हेही वाचा:


Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान महिलांना वारंवार उलट्या होतायत? 'हे' तीन आहेत रामबाण उपाय