ICC Men's Player of the Month : 'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ'साठी विश्वविजेता कर्णधार पॅट कमिंस (Pat Cummins) याला नामांकन मिळाले आहे. पॅट कमिंसशिवाय बांगलादेशचा गोलंदाज तैजुल इस्लाम आणि न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलीप्स यांना नामांकन मिळालय. डिसेंबर 2023 साठी ही निवड करण्यात येणार आहे. कमिंसच्या (Pat Cummins) नेतृत्वात कांगारुंनी पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली. या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा व्हाईट वॉश केला. शिवाय कमिंसच्या नेतृत्वात कांगारुंनी नोव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषकावर देखील नाव कोरले होते. 


तैजुल इस्लामची न्यूझीलंडविरुद्ध दमदार कामगिरी (ICC Men's Player of the Month)


बांगलादेशच्या तैजुल इस्लामलाही (Taijul Islam) 2023 च्या ICC Men's Player of the Month साठी नामांकन मिळाले आहे. डावखुरा फिरकीपटू तैजुलने (Taijul Islam) बांगलादेशमध्ये खेळवण्यात आलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 6 विकेट्स पटकावल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने न्यूझीलंडविरोधात 150 धावांनी विजय मिळवला होता. मालिकेत बांगलादेशचा पराभव झाला असला तरी तैजुल इस्लाम (Taijul Islam) बांगलादेशचा हिरो म्हणून पुढे आला आहे. तो 15 विकेट्स पटकावत प्लेअर ऑफ द सिरीज ठरला. 


ग्लेन फिलीप्सची अष्टपैलू कामगिरी (ICC Men's Player of the Month)


न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलीप्स (Glenn Phillips) आक्रमक फलंदाजी आणि चांगल्या विकेट किपिंगसाठी ओळखला जातो. त्याने बांगलादेशविरोधात उत्कृष्टा कामगिरी करत न्यूझीलंडच्या विजयात मोठ्या योगदान दिले. मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्यानंतर दोन सामन्यांत ग्लेन फिलीप्सने दमदार कामगिरी करत न्यूझीलंडला मालिकेत पुनरागमन परत आणले. 


कोण होणार आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ  (ICC Men's Player of the Month)


आयसीसीने पॅट कमिंस, ग्रेल फिलीप (Glenn Phillips) आणि तैजुल इस्लाम यांचे आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन केले आहे. मात्र, आयसीसी प्लेअर ऑफ मंथ कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. कामगिरीचा विचार करता पॅट कमिंस बाजी मारेल, असे बोलले जात आहे. 






 


इतर महत्वाच्या बातम्या 


Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेला मुकला, पण झटका मुबंई इंडियन्सला! आता नवीन आजाराने किती महिने मुकणार?