Riyan Parag Century : आसामचा खेळाडू रियान परागने इतिहास रचला आहे. रणजी ट्रॉफी सामन्यात रियान परागने अवघ्या 56 चेंडूत शतक झळकावले. छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. या सामन्यात रियान परागने 87 चेंडूत 155 धावा केल्या. त्याने आपल्या झंझावाती खेळीत 11 चौकार आणि 12 षटकार मारले. मात्र, या सामन्यात रियान परागच्या संघ आसामला पराभवाचा सामना करावा लागला. छत्तीसगडने आसामचा 10 गडी राखून पराभव केला.






ऋषभ पंतच्या नावावर सर्वात कमी चेंडूंवर शतक करण्याचा विक्रम


रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूंवर शतक ठोकण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर आहे. ऋषभ पंतने अवघ्या 48 चेंडूत शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. ऋषभ पंतने 2016 मध्ये झारखंडविरुद्ध ही कामगिरी केली होती. मात्र, आता रियान पराग दुसरा आला आहे. त्याचबरोबर नमन ओझा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. नमन ओझाने 69 चेंडूत शतक झळकावले. नमन ओझाने 2014 साली कर्नाटकविरुद्ध हे शतक झळकावले होते.






रियान परागच्या शतकानंतरही आसामचा संघ हरला


तर आसाम-छत्तीसगड सामन्याबद्दल बोलायचे झाले तर छत्तीसगडने सहज विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजीला आलेल्या छत्तीसगडने पहिल्या डावात 327 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात आसामचा संघ अवघ्या 159 धावांवर गारद झाला. यानंतर आसामला फॉलोऑन लागला. आसामने दुसऱ्या डावात 254 धावा केल्या. रियान परागने निश्चितपणे 155 धावांची खेळी केली, पण बाकीच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे आसाम संघाला केवळ 255 धावा करता आल्या. छत्तीसगडने दुसऱ्या डावात बिनबाद 87 धावा करून सामना जिंकला.






इतर महत्वाच्या बातम्या