एक्स्प्लोर
रायगड परिसरात चोऱ्यांचं सत्र सुरुच, महाडमध्ये तीन फ्लॅटमध्ये चोरी
अलिबाग: गेल्या अनेक महिन्यांपासून रायगडात चोऱ्यांचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळतं आहे. जिल्ह्यातल्या महाड, अलिबाग, मुरुड इथं एकाच दिवशी चोऱ्या झाल्या असून हजारोंचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.
महाड शहरातल्या एकाच इमारतीतल्या एकाच मजल्यावरील तीन फ्लॅटसमध्ये चोरी झाली. तर अलिबाग आणि मुरुडमध्येही घरफोड्या करण्यात आल्या.
अलिबाग तालुक्यातील काविर येथील वैशाली पाटील या बाहेरगावी गेल्या असताना त्यांच्या घराची कडी तोडून चोरी करण्यात आली. यामध्ये पाटील यांच्या घरातून सुमारे ४१ हजार रुपये रोख रक्कम आणि २० हजारांचे दागिने चोरण्यात आले आहेत.
तसेच, मुरुड तालुक्यातील शिरगाव येथील राजेश साधू यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून सुमारे ६७ हजार रुपयांच्या दागिन्याची चोरी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement