Ulhasnagar News : उल्हासनगर पालिकेत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार, सीसीटीव्हीच्या माध्यमातून घटना उघडकीस
Ulhasnagar News : उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
उल्हासनगर : उल्हासनगर (Ulhasnagar) पालिकेच जादूटोणा (Black Magic) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका शिपाई कर्मचाऱ्याने पालिका अधिकाऱ्यांच्या वाहनाखाली लिंबू मरची ठेवली.दरम्यान हा कर्मचारी लिंबू मिरची टाकत असताना सीसीटीव्हीत कैद झाला. दरम्यान या पालिका कर्मचाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
उल्हासनगर पालिकेचे सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांच्या गाडीखाली एका पालिका कर्मचाऱ्याने लिंबू मिरची ठेवली. या घटनेची माहिती मिळताच मनीष हिवरे यांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासला. सीसीटीव्हीमध्ये त्यांना हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यावेळी त्यांना संबंधित कर्मचारी धनंजय गायकवाड हा लिंबू मिरची गाडीखाली ठेवताना दिसला. धनंजय गायकवाड हा पालिकेत शिपाई खात्यात काम करतो. दरम्यान या घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत मनीष हिवरे यांनी तातडीने पालिका आयुक्तांना लेखी तक्रार दाखल केली.
तसेच संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यामुळे मनीष हिवरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याची शंका देखील व्यक्त केली जातेय. तर यामगचा खरा सूत्रधार कोण हा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय. तसेच हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे सावधनीच्या दृष्टीने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणे गरजेच असल्याचं पालिका आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले आहे. त्यामुळे यामध्ये त्या पालिका कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जादूटोण्याचे वाढते प्रकार
मागील अनेक दिवसांपासून राज्यात जादूटोण्याचे प्रकार वाढत चालल्याचं चित्र आहे. त्यामुळे या विरोधात कठोर नियम करण्यात यावे अशी मागणी सध्या करण्यात येतेय. त्यामुळे अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी कोणते कठोर नियम करण्यात येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच यामागे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पुण्यातील धक्कादायक प्रकार
पाण्याच्या टाकीत पैसे टाका सगळे पैसे 20 पट करून देतो, असं सांगत पुण्यातील महिलेला 20 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. रूममध्ये धूर करून, पूजा करतो तसंच 20 लाखांचे 12 दिवसात 5 कोटी होतील या अमिषाला महिला पडली बळी. पुण्यातील मध्यवर्ती असलेल्या नारायण पेठेत ही घटना घडली.