गणेश विसर्जनासाठी ठाण्यात वाहतुकीत बदल; 'या' ठिकाणी प्रवेश बंद, 'असे' आहेत पर्यायी मार्ग
Thane Ganesh Visarjan : ठाण्यामध्ये गणेश विसर्जनासाठी पोलिस प्रशासन सज्ज झालं असून अनेक मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे.
ठाणे : शहरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. अनंत चतुर्थीला ठाणे शहरात सार्वजनिक आणि खाजगी गणेशाचे विसर्जन करण्यात येते. गणेश विसर्जनाच्या वेळी सार्वजनिक मंडळ ढोल-ताशे, डीजेच्या तालावर नाचत गाजत मिरवणूक काढत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देतात. त्यामुळे शहरातील वाहतूक बाधित होते. ठाणेकरांना याचा त्रास होऊ नये म्हणून ठाणे शहर वाहतूक विभागाच्या वतीने शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आलेले आहेत.
ठाणे शहरातील गणेशाचे विसर्जन हे साकेत, कळवा खाडी, आदी ठिकाणी करण्यात येणारे विसर्जनाच्या मिरवणूक या शहरातून जात असल्याने वाहतूक सुरळीत राहावी म्हणून वाहतुकीतील बदल करण्यात आलेले आहेत. सदरचे वाहतूक बदल हे मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून रात्री गणेशाचे विसर्जन होईपर्यंत अमलात राहणार असल्याचे वाहतूक अधिसूचनेत नमूद करण्यात आलेले आहे.
1- प्रवेश बंद : साकेत विटावा तसेच कळवा नाकाकडून क्रिक नाका मार्गे सिडकोकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना क्रीक नाका येथे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग : क्रीक नाका येथून कोर्ट नका मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा जांभळी नाका बाजारपेठ स्टेशन रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
2- प्रवेश बंद: जीपीओ कोर्ट नाका येथून ठाणे रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग: डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून डावीकडे वळून जांभळी नाका बाजारपेठ स्टेशन रोड मार्गे एवंन फर्निचर मार्गे स्थळे जातील.
3- प्रवेश बंद: चरई व सिविल हॉस्पिटल कडून टेंभी नाका कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनपा शाळा येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग: कोर्ट नाका सर्कल इथून उजवीकडे वळून बाबासाहेब आंबेडकर चौक इथून डावीकडे वळून जांभळी नाका बाजार स्टेशन रोड मार्गे फर्निचर मार्गे येथून इच्छित स्थळे जातील.
4-प्रवेश बंद: ठाणे स्टेशन कडून टॉवर नाका टेंभी नाका कडे जाणाऱ्या बसेस सह सर्व प्रकारच्या वाहनांना मूस चौक व टॉवर नका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग: ठाणे रेल्वे स्टेशन कडून सॅटिस ब्रिज वरून येणाऱ्या परिवहणच्या सर्व एसटी टीएमटी बसेस बी केबिन सॅटिस वरून गोखले रोड मार्गे जातील तसेच रिक्षा चार चाकी लहान वाहने सॅटिस ब्रिज खालून मूस चौक येथून सरळ टॉवर नका टेंभी नका मार्गे जातील.
सदर वाहतूक अधिसूचना पोलिस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, गणेश मूर्ती विसर्जनातील वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.
ही बातमी वाचा: