एक्स्प्लोर

शहापूरातील माहुली गडाच्या पायथ्याशी तरुणाचा बुडून मृत्यू, बंदी असूनही पर्यटकांची उपस्थिती

माहुली गडाच्या पायथ्याशी असलेल्या रांजण खळगे धबधब्यावर साडेबाराच्या सुमारास आंघोळीचा आनंद घेत असताना 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

Thane : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. माहुली गडाच्या पायथ्याशी असलेल्या रांजण खळगे धबधब्यावर साडेबाराच्या सुमारास आंघोळीचा आनंद घेत असताना 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. सॅम राज दुराई असं या मृत तरुणाचे नाव आहे. तो मुंबईतील कुर्ला परिसरात राहत होता. तो आपल्या पाच मित्रांसह माहुली गडाच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर फिरण्यासाठी आला होता. यावेळी ही घटना घडली.

दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश

या घटनेची माहिती मिळताच NDRF टीम आणि जीव रक्षक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदर तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रशासनाने या धबधबा परिसरात पर्यटनासाठी बंदी घातलेली असूनही पर्यटकांचा वावर सातत्याने सुरू आहे. या ठिकाणी यापूर्वीही जवळपास 60 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे. तरीदेखील नागरिक जीवनाच्या धोक्याची पर्वा न करता येथे गर्दी करत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांना अशा ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

राज्यात पर्यटनाच्या ठिकाणी अपघातांच्या घटनांमध्ये वाढ

राज्यात सातत्यानं पर्यकांचा अपघात झाल्याच्या घटना घडत आहेत. पर्यटनाला जाताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. धोक्याची ठिकाणी जपून गेलं पाहिजे, पण अशा ठिकाणांवर काही पर्यटक हुल्लडबाजी करताना देखील दिसतात. त्यामुळं अपघाताच्या घटना घडत आहेत. प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊन देखील पर्यटक सूचनांचे योग्य प्रकारे पालन करत नाहीत, त्यावेळी अशी घटना होतात. गेल्या काही दिवसापूर्वीच पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल दु्र्घटना ताजी असताना देखील पर्यटक पर्यटनाच्या ठिकाणी योग्य ती खबदारी घेतना दिसत नाहीत. पुण्यात इंद्रायणी नदीवर असलेल्या ब्रीजवर एकाचवेळी अनेक पर्यटक आल्या पूल तुटल्याची दुर्घटना घडली होती. यामध्ये 4 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, पर्यटकांनी पर्यटनाच्या ठिकाणी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Nashik News: बांधकाम साईटच्या कृत्रिम तलावात पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने आक्रीत घडलं; नाशिकमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sahar Shaikh Mumbra AIMIM: करारा जवाब मिलेगा! 'नॉट रिचेबल' सहर शेख यांचे वडील मुंब्रा पोलिसांत हजर, म्हणाले, 'दोन दिवसात...'
करारा जवाब मिलेगा! 'नॉट रिचेबल' सहर शेख यांचे वडील मुंब्रा पोलिसांत हजर, म्हणाले, 'दोन दिवसात...'
Sahar Shaikh Mumbra AIMIM: नगरसेवकपद धोक्यात, मग नॉट रिचेबल...सहर शेख वानखेडेवर, स्टोरी पोस्ट करत म्हणाल्या, गेम ओव्हर!
नगरसेवकपद धोक्यात, मग नॉट रिचेबल...सहर शेख वानखेडेवर, स्टोरी पोस्ट करत म्हणाल्या, गेम ओव्हर!
महिलेसह दोन अधिकाऱ्यास अटक, 50 हजारांची मागितली लाच; एसीबीने सापळा रचून पडकलं रंगेहाथ
महिलेसह दोन अधिकाऱ्यास अटक, 50 हजारांची मागितली लाच; एसीबीने सापळा रचून पडकलं रंगेहाथ
लग्नानंतर हनिमूनच्या रात्रीच नवरी पळाली, घरातील मौल्यवान वस्तूही गायब; पोलिसांकडून लुटेऱ्या टोळीचा पर्दाफाश
लग्नानंतर हनिमूनच्या रात्रीच नवरी पळाली, घरातील मौल्यवान वस्तूही गायब; पोलिसांकडून लुटेऱ्या टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे

बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
Gold : 2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले,अक्षय तृतीयेपूर्वी सोन्यात चढ-उतार; पुढे काय होणार, मोतिलाल ओसवालचा अहवाल काय सांगतो?
2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले, पुढं काय होणार,मोतिलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचा अहवाल काय सांगतो?
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी
जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी
Goa News: 'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
Embed widget