एक्स्प्लोर

TMC Budget: ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या होणार सादर, होऊ शकतो घोषणांचा पाऊस

Thane Municipal Corporation Budget: जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या ठाणे महापालिकेचा यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प आज प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे.

Thane Municipal Corporation Budget: जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या ठाणे महापालिकेचा (Thane Budget) यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प उद्या प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे. जमा-खर्चाचे गणित जुळविण्यासाठी नवे कर्ज काढता येते का, याची चाचपणी पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. तसेच यंदा निवडणुकीचे वर्ष असल्याने कर दरवाढ प्रस्तावित करण्याची शक्यता कमी आहे. तसेच राज्य शासनाकडून आलेल्या निधीतून शहरात रस्ते, सुशोभीकरण, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती अशी कामे सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या प्रकल्पांची छाप अर्थसंकल्पात दिसून येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी 2022-23 चा 3 हजार 999 कोटींचा अर्थसंकल्प ठराविक वेळेत जाहीर केला होता. डॉ शर्मा यांच्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प (Thane Budget) त्यांनी सादर केला होता. आयुक्त शर्मा नंतर अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. शहरातील नागरी कामे वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. एरवी फेब्रुवारी महिन्यात सादर होणार अर्थसंकल्प यावर्षी मात्र 21 मार्च रोजी सादर केला जाणार आहे.

करोनाकाळात उत्पन्न आणि खर्चाचे गणित बिघडल्याने पालिकेची परिस्थिती बिकट झाली असून, ही स्थिती आजही कायम आहे. त्यातच सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, ठाणे (Thane) परिवहन उपक्रमाच्या अनुदानाचा वाढता भार आणि जुन्या विकासकामांची देयके अदा करताना ठाणे महापालिका प्रशासनाची अक्षरश: दमछाक होऊ लागली आहे. त्यामुळे जमा-खर्चाचे गणित जुळविण्यासाठी नवे कर्ज काढता येते का, याची चाचपणी प्रशासनाने सुरू केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या ठाणे महापालिकेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी देऊ केला आहे. या निधीतून शहरात रस्ते नूतनीकरण, सुशोभीकरण, तलाव सुशोभीकरण, शौचालये दुरुस्ती आणि इतर विकासकामे सुरू आहेत. राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीमुळे पालिकेचा आर्थिक गाडा सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसून येत असले तरी प्रत्यक्षात मात पालिकेच्या तिजोरीत जेमतेम पाच ते दहा कोटी रुपयेच शिल्लक आहेत. महापालिकेच्या मालमत्ता कर तसेच इतर विभागांकडून अपेक्षित करवसुली होत असली तरी ही रक्कम करोनाकाळात पालिकेवर वाढलेले दायित्व कमी करण्यावर खर्च होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत ठाणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून सादर केला जाणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेलAjit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...Praful Patel Shirdi :  धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोललेNana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही,  गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Embed widget